बऱ्याच कालावधीच्या कोरोना लॉकडाऊननंतर घराबाहेर पडून लोकांनी कोरोनासह आपलं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे.
कोरोनाव्हारसचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. जग आता कोरोनाव्हायरसह जगायला शिकलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
घराबाहेर पडताच रहिवाशी बिल्डिंग, ऑफिसमध्ये आपला संपर्क येतो तो लिफ्टशी. या लिफ्टच्या बटणांना किती जणांनी स्पर्श केलेला असेल आपल्याला माहिती नाही. यामुळे कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे या बटणांना स्पर्श टाळण्यासाठी टूथपिक वापरलं जातं आहे. मुबईतील एका रहिवाशी इमारतीतील ही लिफ्ट आहे. जिथं लिफ्टमध्ये एक स्पाँज लावण्यात आला आहे आणि त्यात टूथपिक अडकवण्यात आले आहे. या टूथपिकचा वापर करून लोक बटणांना थेट हातांनी स्पर्श न करता टूथपिक वापरतात. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
थायलंडच्या बँकॉकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये लिफ्टमध्ये हातांनी बटणं दाबण्याऐवजी अशा पद्धतीने पायांनी बटणं दाबण्याची सोय करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
लिफ्टमध्येदेखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं आहे. श्रीलंकेच्या कोलिबंयातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील लिफ्टमध्ये कर्मचारी अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग ठेवतात. लिफ्टच्या चार दिशेने चार लोक एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
ऑफिसचही नाही तर काही देशांमध्ये शाळाही सुरू झाल्या आहेत. अशावेळी शिक्षक आणि मुलांमध्येही आवश्यक तितकं अंतर राखलं जातं आहे. जोर्दानमध्ये एका नर्सरीमध्ये पीपीई सूट, मास्क आणि फेस शिल्ड घालून शिक्षक विद्यार्थ्याला शिकवत आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
माध्यमिक शाळांमध्येही असेच काही नियम आहेत. बेल्जिअमच्या ब्रुसेल्समधील फ्लेमिश सेकंडरी स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी असे षटकोन आखलेले आहेत. प्रत्येक षटकोनात एक विद्यार्थी उभा राहतो आणि अशा पद्धतीने ते एकमेकांशी संवाद साधतात. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
काही देशांमध्ये पार्कही खुले करण्यात आले आहेत. पोर्तुगालमध्ये कासकैसमधील मेरेचल कॅरमोना पार्कमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी असे चौकन आखण्यात आले आहेत. त्यामध्ये पुरेसं अंतर राखत लोक सूर्यप्रकाशाचा पुरेपूर आनंद घेत आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
लोक बीचवरही जाऊ लागलेत. ब्रिटनमधील ब्रिगटॉन शहरातील बीचवरील हे दृश्यं आहे. सार्वजनिक शौचालयासाठी पुरेसं अंतर राखत रांगा लागल्या आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
इतके दिवस घरात एक्सरसाइज, योगा करणारे लोक आता बाहेर पडून व्यायाम करू लागलेत. जीम, योगा क्लासेस सुरू झाले आहेत. कॅनडातील टोरंटो, आँटारिओमध्ये अशा पद्धतीने लोक एका विशिष्ट जागेत योगा करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
एकमेकांना भेटण्याची पद्धतही बदलली आहे. एका काचेच्या खिडकीतून दोन व्यक्ती एकमेकांना भेटताना न्यूयॉर्कच्या ब्रुकलीनमधील हे दृश्यं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
नुकत्याच जन्मलेल्या बाळांचं कोरोनापासून संरक्षण करता करता प्रतिबंधात्मक इतर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांचं लसीकरणही महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिएतनमधील हनोईतील एका नवजात बाळाला लसीकरणासाठी घराबाहेर नेताना त्याला अशा पद्धतीने फेस शिल्ड लावण्यात आला. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
वयस्कर व्यक्तींना कोरोनाचा धोका सर्वात जास्त आहे. मात्र त्याचवेळी या वयात त्यांना आधाराचीही गरज असते. त्यामुळे त्यांच्यासाठी रोबो आधार झाला आहे, जो या वयोवृद्धांना त्यांच्यापासून दूर असलेल्या त्यांच्या प्रिय व्यक्तींना भेटवून देतो. बेल्जिअमधील ओस्टेंडमध्ये 93 वर्षांचा व्यक्ती झोराबोट्सने तयार केलेल्या या रोबोमार्फत आपल्या प्रिय व्यक्तींशी संवाद साधत आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
सलूनमध्ये गेलात तरी तुम्हाला बार्बरनी असे डॉक्टरांप्रमाणे पीपीई सूट घातलेले दिसतील. फिलिपाइन्सच्या मेट्रो मनिलामधील हे सलून आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
बांग्लादेशच्या ढाकामधील सलूनमध्येदेखील अशीच आवश्यक ती काळजी घेतली जाते आहे. शिवाय दोन ग्राहक एकत्र आल्यास त्यांच्यामध्ये पुरेसं सोशल डिस्टन्सिंग राहिल याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
ब्युटी सलूनमध्येदेखील असेच नियम पाळले जात आहेत. लंडनमध्ये ब्युटी ट्रिटमेंट देणाऱ्या व्यक्तीने मास्कसह फेस शिल्ड लावला आहे. शिवाय ग्राहकांनादेखील मास्क घातला जातो आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
कोरोना लॉकडाऊनमध्ये काही जणांवर उपाशी राहण्याचीही वेळ आली. चिलीमधील अशाच लोकांसाठी अन्नधान्याचा पुरवठा करण्याची सोय करण्यात आली. ज्यांचं उत्पन्न कमी झालं आहे किंवा काहीच मिळत नाही. त्यांना गरमागरम जेवण पुरवलं जातं. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
प्रवास करतानाही मास्क बंधनकारक आहे. मात्र प्रवासी गाड्यांमध्येही आवश्यक ती काळजी घेतली आहे. फिलिपाइन्समध्ये एका गाडीत अशा पद्धतीने प्लॅस्टिक लावण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांचा थेट संपर्क येणार नाही. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
ब्रिटनच्या हिटथ्रो विमानतळावर दोन सीटच्या मध्ये असे बोर्ड ठेवण्यात आलं आहे. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
हॉटेल, रेस्टॉरंट्सचीही रूप बदललेलं पाहायला मिळेल. मेक्सिकोतील जॅसो बेकरी रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग राखावं यासाठी दोन टेबलच्या मध्ये टेडी बिअरला बसवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
तर ब्रिटनच्या सेंट व्हिला बार आणि रेस्टॉरंटच्या आऊटडोर परिसरात अशा पद्धतीने एका काचेचा बॉक्स तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एखादा ग्रुप एकत्र बसून लंच-डिनरचा आनंद घेतो. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
थायलंडच्या बँकॉकमधील थायवानीझ हॉट पॉट स्टाइल रेस्टॉरंटमध्ये एका टेबलवर अशा पद्धतीने ग्लास टाकून दोन भाग पाडण्यात आले. टेबलवर समोरासमोर आणि शेजारी अशा पद्धतीने कुणी बसणार नाही. तर क्रॉस सेक्सशनमध्ये बसण्याची सोय करण्यात आली आहे. वेटर्सही फेस शिल्ड आणि ग्लोव्ह्ज घालून सर्व्हिस देत आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
हॉटेल्सच्या आतच नाही तर बाहेरदेखील खाद्यविक्रेते अशीच काळजी घेत आहेत. ब्रिटनमध्ये बेरकेली हॉटेल पोलीस अधिकाऱ्याला फूड देताना हा फोटो (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
काही देशांमध्येच फिल्म थिएटर्सही खुली करण्यात आली आहेत. फ्रान्सच्या पॅरिमधील MK2 सिनेमागृहात सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी अशा खुर्च्यांवर मिनियन्सना बसवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
चीनच्या शांघघाईतील सिनेमागृहात एक खुर्ची सोडून लोक थिएटरमध्ये फिल्म पाहत आहेत आणि प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
फ्रान्सच्या पॅरिसमध्ये काही ठिकाणी असा फ्लोटिंग सिनेमाचं दृश्य दिसेल. पाण्यात बिच चेअर आणि बोटवर बसून लोक फिल्मचा आनंद लुटत आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
नेदरलंडच्या डान्स एवेंटचं हे दृश्यं. देशातील कोरोना लॉकडाऊनंतरचा हा पहिला कोरोना प्रुफ असा हा कार्यक्रम (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
स्पेनमध्ये ऑपेराची तालिम करताना प्रेक्षकांच्या जागेवर अशा पद्धतीने रोप ठेवण्यात आली. प्रेक्षक किती महत्त्वाचा आहे हे यातून सांगण्यात आलं. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
जपानच्या टोक्योतील एका स्टाइल पबमध्ये प्रवेशापूर्वी लोकांवर हायपोक्लोरिअस अॅसिड वॉटर स्प्रे केलं जातं जेणेकरून कोरोनाचा धोका टाळता येईल. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
कोरोना लॉकडाऊनमध्येही बँक सुरूच होत्या. त्यामुळे बहुतेक बँकांमध्ये काऊंटर तुम्हाला असं प्लॅस्टिक पडद्यांनी झाकलेलं दिसेल. शिवाय बँक कर्मचारी आणि ग्राहकांच्या चेहऱ्यावरही मास्क आहे. जपानच्या टोकियोतील एमयूएफजी बँकमधील हे दृश्यं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
फ्रान्सहून स्पेनमध्ये जाताना शेवटच्या टोलनाक्यावर गाड्या तपासणारा पोलीस अधिकारी आणि त्याच्यासह एक रिपोर्टर उभी आहे. वाहनचालकाची प्रतिक्रिया घेताना रिपोर्टरने कशापद्धतीने सावधानता बाळगली आहे ते आपण या फोटोत पाहूच शकतो (फोटो सौजन्य - रॉयटर्स)