JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / खाद्यपदार्थांच्या लिस्टमध्येही कोरोना; CORONA MENU एकदा पाहाच

खाद्यपदार्थांच्या लिस्टमध्येही कोरोना; CORONA MENU एकदा पाहाच

कोरोनाव्हायरसमुळे जीवनशैलीच बदलली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यावर याचा परिणाम झाला आहे.

0106

कोरोना काळात हॉटेल्स खुली झालीत. मात्र आवश्यक ती पुरेपूर खबरदारी घेतली आहे. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता याबाबत काळजी घेतली जात आहे. याशिवाय काही हॉटेलमध्ये आणखी एक बदल दिसून येईल तो म्हणजे खाद्यपदार्थांमध्ये.

जाहिरात
0206

आता हा पाहा मास्क पराठा. मदुराईतील टेम्पल सिंटी या प्रसिद्ध रेस्टॉरंटने हा मास्क पराठा तयार केला आहे. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी मास्क महत्त्वाचा आहे आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा मास्कसारखा पराठा तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा असा संदेश या निमित्ताने दिला जातो आहे.

जाहिरात
0306

याच हॉटेलमध्ये हा कोरोना डोसाही तयार करण्यात आला आहे. सामान्यपणे गोल आकाराच्या असलेल्या या डोशाला कोरोनाचा आकार देण्यात आला आहे. (Image - Twitter)

जाहिरात
0406

अशाच पद्धतीने दक्षिण भारतातीलच एक पदार्थ बोंडा. ज्याला कोरोनाव्हायरससारखा आकार देण्यात आला आहे. बोंडा हा गोल असतो मात्र या कोरोना बोंड्यावर कोरोनासारखे स्पाइक आहेत. हा बोंडादेखील मदुराईतील हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. (Image - Twitter)

जाहिरात
0506

कोलकात्यातील एका मिठाईच्या दुकानात कोरोना केक आणि कोरोना संदेश ही प्रसिद्ध बंगाली मिठाई दिसून येईल. कोरोनाबाबत जनजागृतीसाठी अशी मिठाई तयार करण्यात आली आहे.

जाहिरात
0606

तर व्हिएतनामध्ये कोरोना बर्गर तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये सामान्य बर्गरप्रमाणेच सामग्री वापरली होती. मात्र बर्गरसाठी वापरण्यात येणाऱ्या बनचा आकार कोरोनासारखा ठेवण्यात आला. (Image: AP)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या