नवी दिल्ली,18 जुलै : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार वेतन विधेयकामध्ये बदल करणार असल्याची शक्यता आहे. या कायद्यात बदल झाला तर तुम्हाला मिळणाऱ्या एचआरए अर्थात हाऊस रेंट अलाऊंस आणि एलटीए सारखे भत्ते याची मर्यादा आखली जाऊ शकते. जर असे झाले तर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात येणारा पगार घटणार आहे. तसंच टॅक्स सुद्धा वाढणार आहे. सीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, तुम्हाला मिळणाऱ्या मुळ पगार हा 50 टक्केपेक्षा जास्त न देण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारच्या कॉस्ट टू कंपनी (CTC) मध्ये बेसिक पगारात वाढ करण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली,18 जुलै : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार वेतन विधेयकामध्ये बदल करणार असल्याची शक्यता आहे. या कायद्यात बदल झाला तर तुम्हाला मिळणाऱ्या एचआरए अर्थात हाऊस रेंट अलाऊंस आणि एलटीए सारखे भत्ते याची मर्यादा आखली जाऊ शकते.
जर असे झाले तर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात येणारा पगार घटणार आहे. तसंच टॅक्स सुद्धा वाढणार आहे.
सीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, तुम्हाला मिळणाऱ्या मुळ पगार हा 50 टक्केपेक्षा जास्त न देण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारच्या कॉस्ट टू कंपनी (CTC) मध्ये बेसिक पगारात वाढ करण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देत आहे.
त्यामुळे तुमच्या हातात येणार पगार कमी होणार आहे का ? असा प्रश्न आता निर्माण झालाय. तर याचे उत्तर हो असेच असेल. तुमच्या हातात येणारा पगार कमी होऊ शकतो. तसंच पीएफ, ग्रेच्युटी आणि विमामध्ये तुमचे देणारे पैसे वाढतील. आता हे पाहावं लागेल की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकात बदल होतो की अजून काही तोडगा काढला जातो हे पाहावं लागणार आहे.