चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

Renuka Dhaybar
मुंबई, 19 जून : चीनच्या हेनानमध्ये फूक्सी नावाच्या डोंगरावर जगातला सगळ्यात लांब आरशाचा ब्रिज बांधण्यात आला आहे. या ब्रिजचा आकार 'U' सारखा आहे. चीनच्या हेबेई प्रांतातल्या शिजियाझुआंग शहरात बनलेला हा काचेचा पुल 488 मीटर लांब आहे. हा पुल जमिनीच्या 218 मीटर वर बांधलेला आहे. चीनच्या हुनान प्रांतात झांगजीयाजी राष्ट्रीय उद्यानात हा जगातील सर्वात उंच पूल आहे. हा पूल 300 मीटर उंच आणि 430 मीटर लांबीचा आहे.

माउंट हुआशनवर बनलेला हा सगळ्यात खतरनाक हाइकिंग ट्रेल आहे. 2090 मीटर ऊंचीच्या खडकाला कापून हा रस्ता बनवण्यात आला आहे. बीजिंगमध्ये बांधलेला हा जगातील सर्वात मोठा काचेचा प्लॅटफॉर्म आहे. ग्रँड कॅनयन स्कायवॉकपासून 11 मीटर लांब आहे. सात किलोमीटरवर पसरलेल्या या ठिकाणावरून आपण जगातील सर्वात लांब केबल कारच्या स्वारीचा आनंद घेऊ शकता. केवळ 30 मिनिटांत, केबल कारने प्रवास पूर्ण करुन आपण तियानमेन माउंटनच्या शीर्षावर पोहचू शकतो. चीनच्या हुनान प्रांतामधील झांगजियाजीमध्ये बांधण्यात येणारा हा जगातील सर्वात लांब आणि उंच काचेचा पूल आहे. हा पूल झांगजियाजीच्या भव्य निसर्गरम्य परिसरात स्थित आहे, ज्याला युनेस्कोचा जागतिक वारसा प्रात्प झाला आहे. हा पूल चीनच्या हेबेई प्रांताच्या होंग्यागू परिक्षेत्रमध्ये स्थित आहे. दोन खडकांच्यामध्ये झुलणारा हा 488 मीटर लांब पूल आहे.

Trending Now