हैदराबादमधील प्राणीसंग्रहालयातील सुझी नावाच्या चिंपांझीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
आतापर्यंत तुम्ही पाळीव कुत्रा, मांजर यांचं बर्थडे सेलिब्रेशन पाहिलं आहे. मात्र कधी एखाद्या चिंपांझीचा बर्थडे सेलिब्रेट केल्याचं पाहिलं आहे का?
सुझी असं या चिंपांझीचं नाव आहे. 2011 साली सुझी नेहरू प्राणीसंग्रहालयात आली. सुझी आता 34 वर्षांची झाली आहे.
सजावटदेखील सुझीला आवडेल अशीच होती. सुझीला आवडणारी वेगवेगळी फळं आणि भाज्यांपासून सजावट करण्यात आली.
प्राणीसंग्रहालयात काम करणाऱ्या अगदी मोजक्याच स्टाफच्या उपस्थित सुझीचा वाढदिवस खूप छानप्रकारे साजरा झाला.