बिपाशा बासू ही तिच्या बोल्डनेस एव्हढीच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. आपल्या फिटनेस फंडाची तिनं सीडीही काढली होती. आणि तिला लोकांचा प्रतिसादही मिळाला होता. आता बिपाशानं आपली भूमिका बदललीय. ती अभिनेत्री नसून आता लेखिका बनलीय. तिच्या फिटनेस मंत्राचं पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या पुस्तकाद्वारे अॅरोबिक्स आणि पायलेट्स हे आधुनिक व्यायामाचे प्रकार बिपाशा लोकांपर्यंत पोचवणार आहे. व्यायाम प्रकारासोबत ती डाएटवरही लिहिणार आहे. कारण फिटनेसमध्ये डाएट हा महत्त्वाचा घटक असतो. बिपाशाच्या फिटनेसचं गुपित या पुस्तकातून उघड होणार आहे.
या पुस्तकाद्वारे अॅरोबिक्स आणि पायलेट्स हे आधुनिक व्यायामाचे प्रकार बिपाशा लोकांपर्यंत पोचवणार आहे.