24 जुलैला पृथ्वीच्या दिशेनं येत आहे एक अस्मानी संकट, NASAने दिला इशारा
एकीकडे कोरोनासारख्या अदृश्य संकटाशी सर्व जग मिळून दोन हात करत आहेत. अशा परिस्थितीत दुसरीकडे पूर, भुकंप, वादळ आणि आता उल्का यांचे संकटही येत आहे.
आता आणखी एक अस्मानी संकट पृथ्वीच्या दिशेने येताना दिसत आहे. 24 जुलै रोजी आणखी एका खगोलशास्त्रीय घटनेकडे वैज्ञानिकांचे डोळे लागले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, 24 जुलैपर्यंत एक उल्का पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने (NASA) वर्तवली आहे. 24 जुलै रोजी पृथ्वीच्या जवळून एक मोठी उल्का (Asteroid) जाणार आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, या उल्काचा आकाड प्रसिद्ध लंडन आयपेक्षाही (London Eye) जास्त आहे. नासा सध्या या उल्कावर लक्ष ठेवून आहे.
मुख्य म्हणजे लंडन आयची उंची 443 फूट आहे. लंडन आयपेक्षा या उल्काचा आकार 50 टक्के जास्त असल्याचा अंदाज आहे. याचे नाव Asteroid 2020ND असे ठेवण्यात आले आहे.
या उल्काची रुंदी 170 मीटर असेल. असे सांगितले जात आहे की जेव्हा ही उल्का पृथ्वीवरून जाईल तेव्हा तिचा वेग सुमारे 48,000 किमी असेल. ही पृथ्वीच्या 0.034 AU च्या (Astronomical unit) रेंजमध्ये असेल.
नासाने सांगितले की येत्या काही वर्षांत पृथ्वीवर जवळपास जवळपास 22 उल्कापिंड येऊ शकतात आणि त्यामध्ये टक्कर होण्याची शक्यता असू शकते.
अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी असे म्हणतात.
उल्का कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीवर आदळतात. यांचा आकार लहानमोठा असू शकतो.