भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्या आधी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
IPLमध्ये विराट कोहलीच्या संघाला प्ले ऑफमध्ये माघारी फिरावं लागलं. पण भारतीय क्रीकेट संघाचा कर्णधार आता त्याच्या नव्या जबाबदाऱ्यांसाठी सज्ज झाला आहे.
कोहलीसोबत संपूर्ण भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. कुठल्याही दौऱ्यावर जाण्याआधी विराट कशी तयारी करतो याचे काही फोटो अनुष्का शर्माने शेअर केले आहे.
अनुष्काने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे त्यात विराट बाथरुममध्ये उभा आहे. स्वत: ब्रशने स्पाइक्स स्वच्छ करत आहे.
अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. ‘दौऱ्यावर जाण्याआधी नवऱ्याला स्पाइक्स धुताना पकडलं’ कोहलीच्या नकळत अनुष्काने हा फोटो काढला आहे. विराटचं कॅमेऱ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं.
विराट कोहली ऑस्ट्रेलियाला जात असला तरी दौरा सुरू असतानाच तो भारतात येणार आहे. बीसीसीआय(BCCI) कडून त्याने काही दिवस सुट्टी मागून घेतली आहे. अनुष्का शर्माची डिलिव्हरी याच दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे.