JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / 'दरवाजा तोड दो' म्हटल्यानंतर एका क्षणात दरवाजा तोडणारा दया सध्या काय करतो? वाचा इथे

'दरवाजा तोड दो' म्हटल्यानंतर एका क्षणात दरवाजा तोडणारा दया सध्या काय करतो? वाचा इथे

सतत 20 वर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मालिका सीआयडी (CID) आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंतची आवडत्या मालिकांपैकी एक आहे. सीआयडी म्हटलं कि लगेच आठवतं ते ‘दया, तोड दो ये दरवाजा’ किंवा ‘कुछ तो गडबड है,दया’. जाणून घ्या याच दयाबद्दलच्या काही रंजक गोष्टी

0105

दया म्हणजेच दयानंद शेट्टी नुकताच 51 वर्षाचा झाला आहे . दयानंदला दया बनविण्यात टीव्ही शो सीआयडीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या शोमध्ये तो वरिष्ठ निरीक्षक दयाची भूमिका साकारत होता. या व्यतिरिक्त त्यांनी बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जॉनी गद्दार मध्ये देखील दयाच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं (Instagram @dayanandshetty_official)

जाहिरात
0205

टीव्ही शो सीआयडीनंतर दयानंदने गुट्टूर गू, अदालत आणि सीआयएफ सारख्या शोमध्ये काम केलं आहे, परंतु 2019 पासून तो कोणत्याही कार्यक्रमात किंवा चित्रपटात दिसला नाही. (Instagram @dayanandshetty_official)

जाहिरात
0305

मीडिया रिपोर्टनुसार दयानंद लवकरच एमएक्स प्लेयरच्या क्राइम थ्रिलर वेब सीरिजमध्ये दिसणार आहे ( Instagram @dayanandshetty_official)

जाहिरात
0405

एका मुलाखतीत दयानंद यांनी सांगितले की 1998 पासून तो या मालिकेत सतत दरवाजे तोडत आहे. त्याचं गंमतीत असं देखील म्हटलं आहे की त्याच्या दरवाजा तोडण्याच्या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हायला हवी. 1998 सालीच त्याने सीआयडीसाठी ऑडिशन दिली होती, आणि त्याचा प्रवास दीर्घकाळापर्यंत सुरू होता. (Instagram @dayanandshetty_official)

जाहिरात
0505

खूप कमी लोकांना माहित आहे की, दया एका खास खेळामध्ये पारंगत आहे. 1996 मध्ये दयानंद महाराष्ट्राचा डिस्कस थ्रो चॅम्पियन झाला होता. पण दुखापतीमुळे त्याने खेळ सोडण्याचा आणि अभिनयाच्या जगात येण्याचा निर्णय घेतला. (Instagram @dayanandshetty_official)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या