JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / फक्त 2 आठवड्यात तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांना कोरोना; शाळा सुरू होण्याआधीच धक्कादायक आकडेवारी

फक्त 2 आठवड्यात तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांना कोरोना; शाळा सुरू होण्याआधीच धक्कादायक आकडेवारी

जवळपास सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे.

0106

कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास सहा महिने शाळा बंद आहेत. लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. अशात शाळाही आता सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहेत. 

जाहिरात
0206

भारतात शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे, तर अमेरिकेत काही शाळा सुरू झाल्या आहेत. त्याआधीच झालेल्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

जाहिरात
0306

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार शाळा सुरू होण्याआधीच फक्त 2 आठवड्यात 97,000 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

जाहिरात
0406

अमेरिकेत एकूण 338,000 मुलांना कोरोना लागण झाली आहे, त्यापैकी जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यातच 97,000 मुलांना कोरोना झाला.

जाहिरात
0506

अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने 16 जुलै ते 30 जुलै आकडेवारीचा रिपोर्ट जारी केला आहे.

जाहिरात
0606

याआधी इज्राइललाही शाळा सुरू करण्याचा निर्णय महागात पडला. कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी होताच या देशाने शाळा सुरू केल्या आणि 261 जण कोरोना संक्रमित झालेत. त्यामुळे 6800 मुलांना क्वारंटाइन करण्यात आलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या