JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / 18 कोटी भारतीयांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज; सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक माहिती

18 कोटी भारतीयांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज; सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक माहिती

देशभरातील नागरिकांचा अँटिबॉडी टेस्ट (antibody test) अहवाल सादर करण्यात आला आहे.

019

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आतापर्यंत 11 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

जाहिरात
029

जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत यूएस, ब्राझीनंतर तिसरा क्रमांक भारताचा आहे. 

जाहिरात
039

भारतात दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे आणि याचं कारण म्हणजे भारतात चाचण्याही मोठ्या प्रमाणात होत आहेत. थायरोकेअर या प्रायव्हेट लॅबने देशभरात केलेल्या अँटिबॉडी टेस्टचा अहवाल नुकताच जारी केला आहे. 

जाहिरात
049

अहवालानुसार जवळपास 18 कोटी लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज असल्याचं दिसून आलं.

जाहिरात
059

देशातील जवळपास 15% भारतीयांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्यात.

जाहिरात
069

कोरोनाव्हायरसची लागण झालेली असल्यास त्याविरोधात शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. शरीरात अँटिबॉडीज असणं म्हणजे त्या व्यक्तीला आधी कोरोना झालेला असू शकतो.

जाहिरात
079

दिल्लीत 23.48 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज मिळाल्यात. दिल्लीतील 47 लाख लोकांना कोरोना झाला मात्र त्यांच्यामध्ये लक्षणं दिसून आली नाहीत.

जाहिरात
089

मुंबईतही अनेकांना कोरोना होऊन गेला मात्र त्यांना याची माहितीच नाही. थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15 टक्के, घाटकोपरला 36.7 टक्के, सांताक्रुजला 31.45 टक्के तर वांद्रे पश्चिमेला 17 टक्के जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचं या रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

जाहिरात
099

कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरू शकतो. फक्त शिंकताना, खोकतानाच नाही तर बोलताना आणि श्वासामार्फतदेखील व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं, असं संशोधकांनी म्हटलं. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील हवेतून कोरोना पसरू शकतो ही शक्यता नाकारली नाही. काही ठिकाणी हवेतून कोरोना पसरण्याचा धोका आहे, असं WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत, असे रुग्णदेखील कोरोना पसरण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि लक्षणं न दिसणाऱ्या या रुग्णांमुळे आता चिंता वाढली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या