JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / कमाल! एक मिनिट हँड-स्टँडमध्ये 35 योगासनं; 11 वर्षीय निधीचा वर्ल्ड रेकॉर्ड

कमाल! एक मिनिट हँड-स्टँडमध्ये 35 योगासनं; 11 वर्षीय निधीचा वर्ल्ड रेकॉर्ड

Hamirpur Yoga Wonder Girl: निधी डोगराने प्रणम आसनमध्ये 45 मिनिटांपर्यंत सलग योगा करत, वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी तिने योग रत्न अवॉर्डही पटकावला आहे.

019

योगामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील निधी डोगराने पुन्हा एका वर्ल्ड बुक ऑफ योगा रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे.

जाहिरात
029

निधी डोगराने 13 सप्टेंबर 2020ला अखिल भारतीय योग महासंघकडून आयोजित ऑनलाईन वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत तिने एका मिनिटात हँड-स्टँडमध्ये 35 विविध आसनं सादर केली होती.

जाहिरात
039

इयत्ता सातवीतील विद्यार्थी असणाऱ्या निधीने, यापूर्वीही दोन वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. 11 वर्षीय निधीने हा तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

जाहिरात
049

कोरोनामुळे ऑनलाईन स्पर्धा झाल्याचं, निधीने सांगितलं.

जाहिरात
059

निधीचे वडील शशि कुमार यांनी सांगतिलं की, 13 सप्टेंबरला निधीने आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भाग घेतला होता. तिने एक मिनिट हँड-स्टँडमध्ये 35 विविध आसनं केली. त्यानंतर, स्पर्धेच्या कमिटीकडून आलेल्या मान्यतेनंतर वर्ल्ड रेकॉर्ड जाहीर करण्यात आला.

जाहिरात
069

निधीची आई निशा देवी यांनी, निधीने तिसऱ्यांदा केलेल्या वर्ल्ड रेकॉर्डमुळे अतिशय आनंदी असल्याचं सांगितलं. तसंच कोरोनामुळे शाळा बंद आहेत, मुलं शाळेत जात नसल्याने त्यांना इतर काही ऍक्टिव्हिटी, उपक्रम दिले पाहिजेत, जेणेकरून मुलांच्या इच्छेनुसार त्यांना खेळण्याची संधी मिळू शकेल, असं त्या म्हणाल्या.

जाहिरात
079

दादा कर्मचंद यांनी आपल्या नातीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. निधीने आपल्या राज्याचं नाव रोशन केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. योग सर्व आजारांना दूर पळवतो, सर्वांनी योगा करावा, तसंच प्रत्येक मुलाला योगाचं शिक्षण देण्यात यावं असंही त्यांनी सांगितलं.

जाहिरात
089

11 वर्षीय निधीला लहानपणापासूनच योगाची आवड आहे.

जाहिरात
099

निधीचे वडील शशि कुमार शाळेत योगा शिक्षक आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या