14 डिसेंबर, नवी दिल्ली : गुजरात विधानसभा 2017च्या निवडणुकीत बहुतांश एक्झिट पोल्सनी भापजला वाढीव जागा दाखवल्याबद्दल काहिसं आश्चर्य व्यक्त केलंय खरं पण त्यांनी त्यावर अविश्वासही व्यक्त केलेला नाही. विशेष म्हणजे स्वतः योगेंद्र यादव यांनी मात्र, कालच गुजरातमध्ये काँग्रेस जिंकणार असल्याचा निवडणूक अंदाज व्यक्त केलाय. योगेंद्र यादव यांच्या कालच्या व्टिटवरून त्यांना भाजप समर्थकांनी बराच काळ ट्रोलही केलं होतं.
योगेंद्र यादव यांनी कालच आपला स्वत:चा एक्झिट पोल जाहीर केलाय. पण आजचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये काही जागा मागे पुढे होतील पण कदाजित भाजपच पुढे राहिल असं म्हटलंय. अर्थात हा अंदाज माझा नाहीतर एक्झिट पोलचा आहे असं नमूद करायला ते विसरले नाहीत. योगेंद्र यादव हे एक्झिट पोल क्षेत्रातले जाणकार मानले जातात. राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या सीएसडीएस संस्थेवरही त्यांनी बराच काळ काम पाहिलेलं आहे. योगेंद्र यादव यांचे आजचे ट्विट-
योगेंद्र यादव यांचे कालचे ट्विट-