महिलांच्या तुलनेत पुरुष कोरोना ग्रस्तांची संख्या जास्त आहे. यामागे नेमकं कारण काय आहे हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे.
जगभरात कोरोनाचा कहर आहे. मात्र महिलांपेक्षा पुरुष या आजाराचे जास्त शिकार होत आहेत. यामागे नेमकं कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.
महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाची लागण का होते आहे, याबाबत नेदरलँडच्या काही शास्त्रज्ञांनी चार कोरोना रुग्णांचा अभ्यास केला. यामध्ये पूर्णपणे निरोगी असलेल्या रुग्णांनाही कोरोनाव्हायरस गंभीररित्या आजारी पाडतो असं दिसून आलं. जामा या मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
अभ्यासात वेगवेगळ्या कुटुंबातील 21 ते 32 वयोगटातील प्रत्येकी दोन भावांचा समावेश होता. सुरुवातील हे सर्वजण चांगले होते. मात्र 23 मार्च ते 25 एप्रिलदरम्यान त्यांना कोरोनामुळे आयसीयूमध्ये भरती करावं लागलं. 29 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यूही झाला.
जेव्हा कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं जेनेटिक विश्लेषण करण्यात आलं तेव्हा त्यात दोष सापडले. या दोषामुळे त्यांच्या शरीरात सेल्स इंटरफेरन्स नावाचे अणू तयार होत होते. या अणूंमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर दुष्परिणाम होतो ज्यामुळे त्यांचं शरीर कोरोनाशी नीट लढा देऊ शकत नाही.
चारही कोरोना रुग्णांच्या ज्या जिनमध्ये दोष दिसून आले ते म्हणजे एक्स क्रोमोसोममध्ये आढळतात. पुरुषांमध्ये एक्स क्रोमोसोमची एकच कॉपी असते. तर महिलांमध्ये दोन असतात. महिलांच्या एका एक्स क्रोमोसोममध्ये दोष असला तरी दुसऱ्या एक्स क्रोमोसममुळे त्या ठिक होऊ शकतात. सामान्य जिनमध्ये दो कॉपी असल्याने महिलांना पुरुषांपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो, असं तज्ज्ञ म्हणालेत.
शास्त्रज्ञांनी सांगितलं ही जेनेटिक समस्या खूपच दुरमिळ आहे. कोरोनाच्या सर्वाधिक गंभीर प्रकरणात याचा संबंध असणं कठिण आहे. मात्र इतर लोकांमध्ये दुसऱ्या प्रकारची जेनेटित समस्या असू शकते आणि त्यामुळेच ते कोरोनामुळे जास्त आजारी पडतात हे संकेत या अभ्यासातून मिळत असल्याचं शास्त्रज्ञ म्हणाले.