JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Washim ZP Election Result: वाशिम जिल्हा परिषदेवर मविआचीच सत्ता, पाहा कुणाला मिळाल्या किती जागा

Washim ZP Election Result: वाशिम जिल्हा परिषदेवर मविआचीच सत्ता, पाहा कुणाला मिळाल्या किती जागा

Washim ZP Election Result: वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 5 जागांवर विजय मिळवला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाशिम, 6 ऑक्टोबर : जिल्हा परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल (ZP Election results) समोर आले आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या (Washim ZP Election result) एकूण 14 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) सर्वाधिक म्हणजेच 5 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. पाहुयात कुठल्या पक्षाला किती जागा? राष्ट्रवादी काँग्रेस - 5 काँग्रेस - 2 भाजप - 2 वंचित बहुजन आघाडी - 2 शिवसेना - 1 जनविकास आघाडी - 1 अपक्ष - 1 एकूण जागा - 14 जिल्हा परिषदेची 52 सदस्य संख्या आहे. या पोटनिवडणुकीमुळं सद्यस्थितीत झालेलं पक्षीय संख्या बळ खालीलप्रमाणे भाजप - 7 शिवसेना - 6 काँग्रेस - 11 राष्ट्रवादी - 14 वंचित बहुजन आघाडी - 6 जनविकास - 6 स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1 अपक्ष - 1 या पोटनिवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी 1) शिवसेना - सुरेश मापारी, उकळी पेन गट 2) काँग्रेस - वैभव सरनाईक, कवठा गट 3) काँग्रेस - संध्या ताई देशमुख, काटा गट 4) वंचित - वैशाली लळे, भामदेवी गट 5) वंचित -लक्ष्मी लहाने, पांघरी नवघरे गट 6)राष्ट्रवादी - चंद्रकांत ठाकरे, आसेगाव गट 7) राष्ट्रवादी- अमित खडसे, भर जहागीर गट 8) राष्ट्रवादी - सुनीता कठोळे, कंझरा गट 9) राष्ट्रवादी - राजेश राठोड, दाभा गट 10) राष्ट्रवादी -शोभा गावंडे, तळप गट 11) भाजप - उमेश ठाकरे, कुपटा सर्कल 12) भाजप - सुरेखा चव्हाण, फुल उमरी गट 13) अपक्ष - स्वरस्वती चौधरी, पार्डी गट 14) जनविकास आघाडी - पूजा भुतेकर, गोभणी गट यापूर्वी गेल्या निवडणुकीतही वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा होत्या. त्यानंतर या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जागा, काँग्रेसच्या दोन जागा आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 8 जागा मविआकडे आहेत. 14 जागांपैकी 8 जागांवर मविआने विजय मिळवल्याने वाशिम जिल्हा परिषदेवर सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्या नंतर वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागा रिक्त झाल्या यामध्ये…. वंचित 4 राष्ट्रवादी काँग्रेस 3 भाजपा 2 जनविकास आघाडी 2, काँग्रेस 1 शिवसेना 1 अपक्ष 1 या 14 जागा रिक्त झाल्यानं वाशिम जिल्हा परिषदेमध्ये सर्व पक्षांचं उरलेलं एकूण संख्या बळ खालीलप्रमाणे होतं राष्ट्रवादी 9 काँग्रेस 9 शिवसेना 5 भाजपा 5 जनविकास आघाडी 5 वंचित 4 स्वाभिमानी 1 नंदुरबार जिल्हा परिषदेवर मविआची सत्ता नंदुरबार जिल्हा परिषदेच्या (Nandurbar ZP Election Result) सर्वच्या सर्व म्हणजे 11 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला (BJP) झटका बसला आहे कारण त्यांच्या जागा तीनने कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) जागेत एक-एकने वाढ झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक जागा जिंकली आहे. गेल्यावेळी पेक्षा यावेळी जागा कमी झाल्याने हा भाजपसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. नंदुरबारमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा? एकूण जागा - 11 भाजप - 4 शिवसेना - 3 काँग्रेस - 3 राष्ट्रवादी - 3

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या