JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / साधवान, तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तर नाहीत ना पाकिस्तानी दहशतवादी!

साधवान, तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तर नाहीत ना पाकिस्तानी दहशतवादी!

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाकिस्तानातून अश्लिल व्हिडिओचा भडिमार सुरू झाला. यामुळे ग्रुपमधील सदस्य घाबरून बाहेर पडले.

जाहिरात

ज्या मेसेजिंग अॅपमध्ये युजर्संना ग्रुप चॅट करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, अशी माहिती एका आंतरराष्ट्रीय मासिकात छापण्यात आलेल्या रीसर्चमध्ये नमुद करण्यात आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 जून : पाकिस्तानातून दहशतवादी भारतात प्रवेश करतात. पण आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही पाकिस्तानची घुसखोरी सुरू झाली आहे. ग्रुपमधल्या युवकांना पाकिस्तानातून व्हिडीओ कॉल केले जात आहेत. पाकिस्तानकडून आलेल्या या व्हिडिओ कॉलमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरताना साधधान राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानातून एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्रमण करण्यात आलं आहे.  पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाकिस्तानातून अश्लिल व्हिडिओचा भडिमार सुरू झाला. यामुळे ग्रुपमधील सदस्य घाबरून बाहेर पडले. या ग्रुपमध्ये पाकिस्तानी युवकांनी युवती असल्याचं भासवून काहींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. ऍडमिनने हे क्रमांक काही काळातच ग्रुपमधून हटवले. मात्र काही युवकांना पाकिस्तानमधून व्हिडीओ कॉलही आले अशी माहिती सायबर सेलचे पीआय अशोक इंदलकर यांनी दिली आहे. फेसबुकवरून काही दिवसांपूर्वी भारताच्या लष्करी जवानांना जाळ्यात ओढण्यात आलं होतं. त्यामुळे या अनुभवावरून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तर आपण आपले नंबर कुठे शेअर करतो आणि कोणाला देतो याची माहिती असणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, ज्या नंबरवरून व्हिडिओ कॉल आले त्याचा पोलीस आणि सायबर सेलकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तर आपला नंबर कोणत्याही अॅपवर शेअर करण्याआधी अॅपसंदर्भात संपूर्ण माहिती घ्या असा सल्लाही सायबर सेलकडून देण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकारामागे नक्की कोणाचा हात आहे. यातून भारतीयांचा काही डेटा तर चोरला जात नाही ना याची माहिती घेण्याचं काम करण्यात येत आहे. पण या सगळ्या नागरिकांनी मात्र सतर्क राहण्याची गरज आहे. मान्सूनपूर्व पावसाचा फळं बागायतीचा तडाखा, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या