JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / फाटक्या जीन्सनंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याचं आणखी एक वादग्रस्त विधान

फाटक्या जीन्सनंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याचं आणखी एक वादग्रस्त विधान

अलीकडचे महिलांच्या फाटक्या जीन्सबाबत (Ripped Jeans) विधान केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (CM Tirath Singh Rawat) यांनी आणखी एक वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 मार्च: अलीकडचे महिलांच्या फाटक्या जीन्सबाबत (Ripped Jeans) विधान केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (CM Tirath Singh Rawat) यांनी आणखी एक वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलं आहे. रविवारी रामनगर याठिकाणी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वन्य दिनानिमित्तच्या कार्यक्रमात सीएम रावत यांनी टाळेबंदीच्या काळात सरकारने वितरीत केलेल्या अन्नधान्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही समुदायाचं नाव न घेता जास्त मुलं जन्म घालणाऱ्या लोकांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे देशात आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री रावत म्हणाले की, ‘लॉकडाऊनच्या काळात सरकारने तांदूळ वाटल्यामुळे काही लोकांना हेवा वाटत होता. कारण ज्यांच्या कुटुंबात दोन लोकं आहेत, त्यांना 10 किलो धान्य देण्यात आलं. तर ज्यांच्या कुटुंबात 20 लोकं आहेत, त्यांना एक क्विंटल धान्य का दिलं गेलं? यानंतर मुख्यमंत्री रावत पुढे म्हणाले की, “याचा दोष कोणाला द्यायचा, त्यानं 20 मुलांना जन्म दिला, आणि तुम्ही केवळ दोघांना दिला. त्यामुळे त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं, तर त्यांचा हेवा वाटून घेता. जेव्हा वेळ होती, तेव्हा फक्त दोघांनाच का जन्म दिला, 20 जणांना का नाही दिला?’ त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावेळी भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा उल्लेख केला नाही.

संबंधित बातम्या

हे ही वाचा - CM तीरथ रावतांच्या मुलीनंच फाटलेली जीन्स घातली का? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं तथ्य पण तीरथ सिंह रावत यांनी त्यांच्या भाषणांत एक तथ्यात्मक चूक केली आहे. ते भाषणात म्हणाले की, भारत 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होता. पण त्यांच हे विधान तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचं आहे. खरंतर तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रं हाती घेतल्यापासून एकाच आठवड्यात दोनवेळा वादग्रस्त विधानं केली आहेत. महिलांच्या फाटक्या जीन्सबाबच्या वादानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. अशात आणखी एका वादग्रस्त विधानामुळे उत्तराखंडचं राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या