JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मोठी बातमी! बलाढ्य अमेरिकेलाही तालिबाननं झुकवलं? 'या' कामासाठी घ्यावी लागली तालिबान्यांचीच मदत

मोठी बातमी! बलाढ्य अमेरिकेलाही तालिबाननं झुकवलं? 'या' कामासाठी घ्यावी लागली तालिबान्यांचीच मदत

यादरम्यान CNN या अमेरिकी माध्यमात एक आश्चर्यकारक वृत्त प्रसिद्ध झालं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल/वॉशिंग्टन, 01 सप्टेंबर : वीस वर्षं चाललेली लढाई थांबवून अमेरिकेच्या (USA) सैन्याच्या फौजा अफगाणिस्तानातून (Afghanistan) माघारी फिरल्या आहेत. त्यानंतर तालिबानने राजधानी काबूलमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kabul Airport) ताबा मिळवला आहे. तो विमानतळ आतापर्यंत अमेरिकेच्या सैन्याच्या ताब्यात होता. अफगाणिस्तानमधल्या केवळ पंजशीर (Panjshir Province) प्रांतातल्या नॉर्दर्न अलायन्सविरुद्ध (Northern Alliance) तालिबानची (Taliban) लढाई आता सुरू आहे. यादरम्यान CNN या अमेरिकी माध्यमात एक आश्चर्यकारक वृत्त प्रसिद्ध झालं आहे. ज्या तालिबानच्या विरोधात अमेरिका गेली 20 वर्षं लढत होती, त्याच तालिबानची मदत घेऊन अमेरिकेने आपल्या देशातल्या नागरिकांना काबूलमधून सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तातल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सैन्याचा तालिबानसोबत एक गुप्त करार झाला होता. त्यानुसार अमेरिकी नागरिकांना कोणत्याही त्रासाविना आणि अडचणीविना काबूल विमानतळावर जाऊ देण्यात आलं. अमेरिकेने काबूल विमानतळावर काही कॉल सेंटर्स (Call Centres) तयार केली होती. एक गुप्त प्रवेशद्वारही (Secret Gate) तयार करण्यात आलं होतं. या कॉल सेंटर्सच्या मदतीने अमेरिकी सैन्य आपल्या नागरिकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत होतं. तसंच, तालिबानी दहशतवाद्यांनीही गुप्त प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकी नागरिकांना मदत केली, असं वृत्तात म्हटलं आहे. या गुप्त प्रवेशद्वारातून किती अमेरिकी आणि किती अफगाणी नागरिकांना विमानतळावर पोहोचण्यास मदत मिळाली, याची नेमकी माहिती बातमीत दिलेली नाही; मात्र अखेरच्या दिवसांमध्ये या गुप्त मार्गाद्वारे अमेरिकेच्या एक्झिट ऑपरेशनला (USA Exit Operation) वेग आला एवढं निश्चित असल्याचं त्या बातमीत म्हटलं आहे. अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर पडले आहेत; मात्र अद्याप 200 अमेरिकी नागरिक अफगाणिस्तानात आहेत. आता अमेरिका कतारमार्गे त्या नागरिकांना अमेरिकेत परत आणणार आहे. हे वाचा - अल् कायदाकडून तालिबानचं अभिनंदन; म्हणे, आता पाळी काश्मीरची! अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी सांगितलं आहे, की 31 ऑगस्टपर्यंत सहा हजार अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर पडले आहेत. दरम्यान, बायडेन यांनी एप्रिलमध्ये असं सांगितलं होतं, की अफगाणिस्तानात 2500 अमेरिकी सैनिक असून, 20 वर्षं सुरू असलेल्या युद्धानंतर आता त्यांना लवकरात लवकर मायदेशी बोलावलं जाईल. तालिबानने ऑगस्टमध्ये वेगाने मोहीम राबवून अफगाणिस्तानातल्या वेगवेगळ्या प्रांतांच्या राजधान्या काबीज केल्या आणि 15 ऑगस्टला काबूलवरही कब्जा केला, तेव्हा अमेरिकेला आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याची अतिरिक्त कुमक तिथे पाठवावी लागली. 15 ऑगस्टला काबूलवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर अमेरिकेने काबूल विमानतळ आपल्या ताब्यात घेतला होता. अखेरच्या काही दिवसांत काबूल विमानतळावर दक्षतेचं वातावरण होतं. गेल्या रविवारी ISIS-K या दहशतवादी संघटनेने या विमानतळावर तीन बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात अमेरिकी सैन्यातल्या 13 कमांडर्ससह एकूण 200 जणांचे प्राण गेले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या