आता हेलिकॉप्टर आणि पाणबुडी भाड्यानं घेऊन सफर करता येणार आहे. उबर कंपनीनं त्याची तयारी देखील केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये ट्राफिक पाहता कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्कमध्ये लोकांची पसंती मिळाल्यास भारतात देखील ही सेवा सुरू केली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये उबर कंपनी पाणबुडी सेवा देखील सुरू करणार आहे. अॅपच्या मदतीनं पाणबुडी बुक करता येणार आहे.
USA TODAYनं दिलेल्या रिपोर्टनुसार न्यूयॉर्कमध्ये उबर कंपनी हेलिकॉप्टर सेवा सुरू करणार आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहॅट ते कनेडी एअरफोर्ट पर्यंत ही सेवा असणार आहे.
ऑस्ट्रेलियातील पाणबुडी सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्राच्या सुंदरतेचं दर्शन केलं जाणार आहे. यातून पर्यटकांना आनंद मिळणार आहे.