JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / कॅन्सर सांगून तरुणी गेली रोमॅंटिक हनिमूनला; लाखोंची उधळपट्टी करुन आता तुरुंगात होणार रवानगी

कॅन्सर सांगून तरुणी गेली रोमॅंटिक हनिमूनला; लाखोंची उधळपट्टी करुन आता तुरुंगात होणार रवानगी

आता तर हद्दच झालीये…लग्न केल्यानंतर तरुणी हनिमूनसाठी तुर्कीला गेली होती.

0105

ड्रिम वेडिंग करण्यासाठी एका तरुणीने जो प्रताप केला तो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या तरूणीने ड्रिम वेडिंगसाठी तिला गंभीर कॅन्सर असल्याचं सांगितलं. कर्करोगाची बातमी ऐकताच तरुणीच्या मित्रांनी तिला लग्नासाठी सुमारे 8 लाख 36 हजार रुपयेही दिले. पण खोटं समोर आल्यानंतर आता तिला तुरुंगातही जावं लागू शकतं.

जाहिरात
0205

29 वर्षीय तरुणीने आपल्या मित्रांकडून पैसे काढण्यासाठी डोक्यावरील केसही कापले होते आणि कर्करोग पीडित असल्याचे सांगून वृत्तपत्रात मुलाखतही दिली होती. तरुणीने मुलाखतीत सांगितलं की, कर्करोगाने तिच्या मेंदू आणि हाडांमध्ये प्रवेश केला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात तरुणी म्हणाली होती की, तिच्याकडे आता केवळ 2 महिनेच शिल्लक आहेत.

जाहिरात
0305

mirror.co.uk च्या रिपोर्टनुसार कर्करोगाच्या बातमीमुळे तरुणीच्या मित्रांनी डोनेशन जमा केलं. याशिवाय त्यांनी ऑनलाइन कॅम्पनेही सुरू केलं होतं. तरुणीचे मित्र आणि इतरांकडून पैसे जमा करीत एकूण 8 लाख 36 हजार रुपये जमा केले.

जाहिरात
0405

इंग्लंडचे चेशायर येथे राहणाऱ्या तरुणीचं नाव टोनी स्डॅन्डेन आहे. 52 वर्षीय जेम्ससोबत लग्न केल्यानंतर ती हनिमूनसाठी तुर्कीला गेली होती. टोनीचे वडील खरं तर कर्करुग्ण होते आणि लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

जाहिरात
0505

टोनीने त्यानंतर असं खोटं सांगितलं की त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यादरम्यान टोनीच्या कर्करोगाचं खोटं पकडलं गेलं. फसवणूक केल्याप्रकरणात टोनीला तुरुंगवास घडू शकतो. गेल्या आठवड्यात त्यांनी फसवणुकीचा गुन्हा कबुल केला आहे. तिच्या मित्रांनी या घटनेला खूप मोठा धोका असल्याचं सांगितलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या