देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 41 लाखांच्या जवळ म्हणजे 40,96,690 लाख एवढी झाली आहे.
भारतात कोरोना रुग्णांचा संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर 80 हजारांच्यावर नवे रुग्ण निघत आहेत.
भारताची लोकसंख्या जास्त असल्याने अजुन काही दिवस आकडेवारी अशीच राहणार असल्याची शक्यता AIIMSचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Director Randeep Guleria) यांनी व्यक्त केली.
देशातल्या काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे असं मतही त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.
देशात दररोज 10 लाख टेस्टिंग होत आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांचा आकडा जास्त असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
2021पर्यंत कोरोना राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र त्याबाबत नक्की काहीच सांगता येणार नाही असंही ते म्हणाले.
ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40,91,801 एवढी असून 1,25, 500 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ही 62 लाखांपेक्षाही जास्त असून 1, 88,000 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असून आत्तापर्यंत 31,72,000 रुग्ण बरे झाले आहेत.