अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून माघार घेतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तालिबाननं काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार आतषबाजी केली. विमानतळावर सगळीकडे सेलिब्रेशन करण्यात आलं. (सर्व फोटो – AFP)
तब्बल 20 वर्षांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतली. अमेरिकेचं शेवटचं विमान निघून गेल्यानंतर तालिबानकडून काबुल विमानतळावर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. अंदाधुंद गोळीबार करत तालिबानींनी हा क्षण साजरा केला.
तालिबानी फायटर्सनी काबुल विमानतळावर ताबा मिळवला असून गोळीबाराची जोरदार आतषबाजी सुरु असल्याचं चित्र दिवसभर दिसत होतं.
अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने काबुल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अमेरिकेच्या माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची औपचारिक घोषणा युएस सेंट्रल कमांड प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांच्याकडून करण्यात आली. शेवटचं अमेरिकी विमान उडाल्यानंतर साधारण एका तासाने तालिबानचं सेलिब्रेशन सुरु झालं.
अमेरिकेची माघार ही ऐतिहासिक घटना असून आता अफगाणिस्तान पूर्णतः स्वतंत्र झाल्याची घोषणा तालिबानकडून करण्यात आली.