JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये मागील 11 दिवसात 32 जणांनी स्वाईन फ्लूने आपला जीव गमावला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 15 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून थैमान घालत असलेल्या स्वाईन फ्लूने आणखी एकाचा बळी घेतला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लू झालेल्या एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाराष्ट्रातील अनेक शहरात स्वाईन फ्लूचं संकट पाहायला मिळतंय. फक्त नाशिकमध्ये मागील ११ दिवसांत ३२ जणांनी स्वाईन फ्लूने आपला जीव गमावला. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूने हाहाकार माजवला होता. त्यानंतर या रोगावर प्रभावी उपचारपद्धती शोधण्यात आली. असं असलं तरी आजही या रोगामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी या रोगाच्या रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या