नाशिक 12 जून : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी आलेल्या लालू प्रसाद यादव यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बोचरी टीका केली. भाजपबरोबर नितीशकुमार यांनी प्रेमविवाह केला म्हणून त्यांचा घटस्फोट झाला अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली तसंच अडवाणी वगैरे काही नाही, तर ही संघाची नाटकं आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.