JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / सलमान- ऐश्वर्याच्या नात्याबद्दल सोहेल म्हणाला, ‘जेव्हा ती भाईसोबत फिरायची.. घरी यायची...’

सलमान- ऐश्वर्याच्या नात्याबद्दल सोहेल म्हणाला, ‘जेव्हा ती भाईसोबत फिरायची.. घरी यायची...’

सलमान म्हणाला की, ‘मी फार भावुक माणूस आहे. लोकं मला मारतील पण मी कोणावर हात उचलत नाही.

0108

सलमान- ऐश्वर्याच्या प्रेमापासून ते प्रेमभंगापर्यंतच्या प्रत्येक गोष्टी साऱ्यांनाच माहीत आहे. दोघांचं एकमेकांसाठीचं प्रेम कधी लपलं नाही. सलमान आणि ऐश्वर्याने जवळपास १९ वर्षांपूर्वी हम दिल दे चुके सनम सिनेमात एकत्र काम केलं.

जाहिरात
0208

या सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम फुलत गेलं. मात्र अवघ्या तीन वर्षात दोघांमध्ये ब्रेकअप झालं. ऐश्वर्याने सलमानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. तर सलमानचं म्हणणं होतं की त्याने असं कधीच केलं नाही. यावर सोहेल खानने सलमान- ऐश्वर्याच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

जाहिरात
0308

सोहेल म्हणाला की, ‘आता ती या सर्व गोष्टी बोलत आहे. पण जेव्हा ती सलमानसोबत फिरत होती आणि आमच्या घरी यायची तेव्हा तिने नात्याचा स्वीकार केला होता का?’

जाहिरात
0408

‘ऐश्वर्याने सलमानला असुरक्षित केलं होतं. ऐश्वर्याचं त्याच्यावर किती प्रेम आहे हेच त्याला जाणून घ्यायचं होतं. मात्र सलमानवर प्रेम आहे की नाही याच्या संभ्रमात ती होती.’ सोहेल पुढे म्हणाला की, ‘जेव्हा ती विवेक ओबेरॉयसोबत होती तेव्हाही ती सलमानच्या संपर्कात होती.’

जाहिरात
0508

यामुळे विवेकही ऐश्वर्यावर नाराज होता. ऐश्वर्याने सलमानवर मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. तर सलमानच्या मते, त्याने असं कधीच केलं नाही. सलमानच्या मते, त्याने ऐश्वर्यावर कधीच हात उचलला नाही.

जाहिरात
0608

सलमान म्हणाला की, ‘मी फार भावुक माणूस आहे. लोकं मला मारतील पण मी कोणावर हात उचलत नाही. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी इतरांना त्रास देण्यापेक्षा स्वतःला इजा करतो.’

जाहिरात
0708

सलमान आणि ऐश्वर्याने ब्रेकअपनंतर कधीही एकत्र काम केलं नाही. सोहेलच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ५ जानेवारीपासून व्हायरल होत आहे.

जाहिरात
0808

५ जानेवारीला अभिषेकचा वाढदिवस असल्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. ऐश्वर्यानेही अभिषेकला सोशल मीडियावर दोघांचा एकत्र फोटो टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या