फाईल फोटो
मुंबई, 23 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, बलात्कार तसेच फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारूच्या नशेत पतीने काचेच्या फुलदाणीच्या साहाय्याने पत्नीसोबत विकृत चाळे केले. या घटनेने अंधेरीत खळबळ उडाली आहे. ही घटना एका अंधेरीतील उच्चभ्रू कुटुंबात घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - याप्रकरणी अंधेरीतील 42 वर्षाच्या एका महिलेने तक्रार दिली आहे. अंधेरीत पीडित महिला आपल्या पती आणि 17 वर्षांच्या मुलासोबत राहत आहे. या महिलेचा विवाह हा 18 वर्षांपूर्वी झाला. या पती पत्नीने यापूर्वीही एकमेकांविरोधात न्यायालयात अनेक तक्रारी केल्या आहेत. तसेच ती प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दारूच्या नशेत पती घरी आला आणि त्याने पत्नीला ठिकठिकाणी चावा घेण्यास सुरुवात केली. तसेच केस ओढून मारहाण केली. इतकेच नव्हे तर घरातील काचेच्या फुलदानीला तेल लावून विकृतीचा कळस गाठला. यावेळी महिलेने तिच्या पतीला प्रतिकार केला. मात्र, त्याने तिचे तोंड दाबून पुन्हा मारहाण केली, अशी तक्रार महिलेने दिली आहे. Instagram वर जुनैद झाला बंटी, प्रेमाच्या जाळ्यात फसवत तरुणीसोबत केलं भयानक कांड याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. तसेच घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी अंबोली पोलिसांनी पतीविरोधात बलात्कार तसेच अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.