JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पत्नीचा बॉयफ्रेंड परतला म्हणून पतीचा मोठा निर्णय, वाचा रिअल लाईफ 'हम दिल दे चुके सनम'

पत्नीचा बॉयफ्रेंड परतला म्हणून पतीचा मोठा निर्णय, वाचा रिअल लाईफ 'हम दिल दे चुके सनम'

सात वर्षांपूर्वी एका फॅशन डिझायनर महिलेचे सॉफ्टवेअर इंजिनीअरशी लग्न झाले होते. या दोघांनाही दोन मुले आहेत. लग्नानंतर सर्व ठीक होते, परंतु

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 29 नोव्हेंबर : 1999 मध्ये आलेला ‘हम दिल दे चुके सनम’ हा सिनेमा तुम्हा सगळ्यांना आठवत असेल. या सिनेमात घडल्याप्रमाणे खरंच सत्यात घडलं आहे. या सिनेमात अजय देवगन आपल्या पत्नी ऐश्वर्या रायला तिच्या एक्स प्रियकर सलमान खानला भेटण्यासाठी घेऊन जातो. पण नंतर पत्नी परत येते. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे पती आपल्या प्रियकराशी पुन्हा एकत्र येण्यासाठी पत्नीला घटस्फोट देणार आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या फॅमिली कोर्टात आली. येथे पतीची इच्छा आहे की, पत्नीने आपल्या प्रियकराबरोबर लग्न केले पाहिजे जेणेकरुन पत्नी सुखी होईल. सात वर्षांपूर्वी एका फॅशन डिझायनर महिलेचे सॉफ्टवेअर इंजिनीअरशी लग्न झाले होते. या दोघांनाही दोन मुले आहेत. लग्नानंतर सर्व ठीक होते, परंतु एका दिवशी त्या महिलेला कळले की प्रियकराने तिच्यापासून लांब झाल्यानंतरही लग्न केलेले नाही. त्यामुळे जुने प्रेम पुन्हा वाढू लागले. आणि नवरा-बायको यांच्यातही वाद वाढू लागला. इतर बातम्या - ‘तेरा ध्यान किधर है?’, डोळ्यासमोर चेंडू पण नजर भलतीकडे; पाक खेळाडूचा VIDEO VIRAL महिला प्रियकरासाठी कुटुंबास सोडण्यास तयार आहे. काउन्सलिंग दरम्यान ही बाब फॅमिली कोर्टात पोहोचली, त्यावेळी पतीने सांगितले की पत्नी तिच्या प्रियकरला विसरण्यास तयार नाही, तर त्याने तिला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. बायकोने सांगितले की, तिला तिच्या प्रियकर सोबत राहायचे आहे. पत्नीचे म्हणणे ऐकल्यानंतर नवऱ्याने कोर्टाला सांगितले की, पती-पत्नीच्या अशा निर्णयामुळे मुलांवर काही परिणाम होऊ नये अशी आपली इच्छा आहे. म्हणून त्याला आपल्या पत्नीस घटस्फोट घ्यायचा आहे जेणेकरुन ती तिच्या प्रियकराबरोबर जगू शकेल. या प्रकरणात सल्लागार म्हणाले की, ‘घटस्फोटाचा खटला नुकताच दाखल झाला आहे, आणि पती आपल्या पत्नीच्या सुखासाठी ज्या प्रकारे बलिदान देण्यास तयार आहे, पत्नीसुद्धा तिच्या प्रियकराबरोबर जगण्यावर पूर्णपणे ठाम आहे. पुढील सुनावणीच्या वेळी ते घटस्फोट घेतील असे दिसते. नवऱ्याने मुलांना आपल्याकडे ठेवण्यास सांगितले आहे, जे पत्नीने स्वीकारले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या