JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / डीएसकेंच्या पाठीशी उभे राहा- राज ठाकरेंचं गुंतवणूकदारांना आवाहन

डीएसकेंच्या पाठीशी उभे राहा- राज ठाकरेंचं गुंतवणूकदारांना आवाहन

नोटबंदीमुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या डिएसकेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीरपणे पुढे आलेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांनी आज पुण्यात राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी डीएसकेंची बाजू घेत या गुंतवणूकदारांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

24 नोव्हेंबर, पुणे : नोटबंदीमुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या डिएसकेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसे  अध्यक्ष राज ठाकरे जाहीरपणे पुढे आलेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांनी आज पुण्यात राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी डीएसकेंची बाजू घेत या गुंतवणूकदारांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला. डीएसकेंसारखा एखादा मराठी उद्योजक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आला असेल आपण त्याला साथ दिली पाहिजे, पैसे देण्यासाठी डीएसकेंना आपण आणखी थोडा वेळ दिला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडलीय. गुंतवणूकदारांच्या बैठकीत राज ठाकरेंनी डीएसकेंवर विश्वास ठेवा, त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहन गुंतवणूदारांना केलंय. डीएसके हे सध्या आर्थिक अडचणीत सापडले असले तरी ते फसवणूक करणाऱ्यांपैकी नाहीत, आपल्या राज्यात सध्या मराठी व्यवसायिकांना संपवण्यासाठी एक लॉबी कार्यरत असून काही राजकारणीही त्यामध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. गेल्या काही दिवसांमधे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींवर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. डीएसकेंना कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या 30 तारखेला डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहिले आहेत. डीएसकेंच्या साडे आठ हजार हजार गुंतवणूकदारांपैकी सातशे ते आठशे गुंतवणूकदार राज ठाकरेंसोबतच्या या बैठकीला उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या