पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' कामगार संघटनेची स्थापना

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' ही देशातली पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात आलीय. फोरम फॉर आयची एम्लाईज या नावाने या संघटनेची पुणे कामगार आयुक्तांकडे रिसतर नोंदणीही करण्यात आलीय. आय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ही संघटना यापुढे काम करेल. असं या संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी स्पष्ट केलंय.

Chandrakant Funde
15 जानेवारी, पिंपरी चिंचवड : आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' ही देशातली पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात आलीय. फोरम फॉर आयची एम्लाईज या नावाने या संघटनेची पुणे कामगार आयुक्तांकडे रिसतर नोंदणीही करण्यात आलीय. आय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ही संघटना यापुढे काम करेल. असं या संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी स्पष्ट केलंय.खरंतर आयटी क्षेत्राकडे आजवर नेहमीच गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणून पाहिलं जातं. पण या क्षेत्रातील ताणतणाव, असुरक्षितता, कामांचे तास याबद्दल कोणीच बोलत नाही. आजमितीला पुणे कामगार न्यायालयात आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांविरोधात 72 खटले प्रलंबित आहेत. यावरून आयटी क्षेत्रातही सर्वच काही आलबेल आहे, असं अजिबात नाही, म्हणूनच आयटी क्षेत्रातीलच काही अभियंत्यांनी एकत्र येत फाईट या संघटनेची स्थापना केलीय.बंगळुरूमध्येही यापूर्वी याच धर्तीवर किटू हा संघटना स्थापन केलीय, पण ती संघटना राजकीय विचारधारेवर आधारीत असल्याने पुण्यातली फाईट हीच देशातली पहिली आयटी कामगार संघटना असल्याचा दावा संस्थापकांनी केलाय. दरम्यान, आयटी कंपनी मालकांनी मात्र, अशा कामगार संघटनेची काहीच गरज नसल्याचं म्हटलंय.

Trending Now