JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, आपल्याच उमेदवाराची फोडली गाडी!

मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, आपल्याच उमेदवाराची फोडली गाडी!

भाजपने घाटकोपर पुर्वेमधून प्रकाश मेहता यांना उमेदवारी देण्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्ये गटबाजी पाहायला मिळत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 ऑक्टोबर : घाटकोपर पूर्वमध्ये भाजपच्या प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला आहे. भाजपने घाटकोपर पुर्वेमधून प्रकाश मेहता यांना उमेदवारी देण्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्ये गटबाजी पाहायला मिळत आहे. पराग शाह त्यांच्या घरी मेहता यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यांची गाडी फोडली तर ते अर्ज भरण्यासाठी जाऊ नये यासाठी त्यांच्या गाडीसमोर दुचाकी आडव्या टाकल्या. या सगळ्या वादामुळे घाटकोपरमध्ये सध्या गदारोळ सुरू आहे. या सगळ्यानंतर प्रकाश मेहता यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती केली आहे. त्यांनी स्वत: खाली उतरून पराग शाह यांच्या गाडीला जाण्यासाठी वाट करून दिली. पण काही केल्या समर्थक ऐकत नसल्याचं चित्र आहे. प्रकाश मेहता आणि पराग शाह यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. सर्व कार्यकर्त्यांना आवरण्याचं काम सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, तिकीटासाठी भांडण करण्याची आपली संस्कृती नाही. असा वाद घालून प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही. असं प्रकाश मेहता यांच्याकडून समर्थकांना सांगण्यात येत आहे. पराग शाहा यांच्या गाडीच्या काचा समर्थकांकडून फोडण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत पराग शहांना उमेवारी अर्ज भरून देणार ऩाही असा पवित्रा समर्थकांकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रकाश मेहता यांनी अपक्ष अर्ज भरून निवडणूक लढवावी. आम्ही तुम्हाला निवडूण देऊ असा आग्रह समर्थकांकडून करण्यात आला आहे. तर ही संपूर्ण तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. तिकीट कापल्यानंतर शरद पवारांशी चर्चा केली? विनोद तावडेंनी केला खुलासा लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यासह मंत्री विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांचं तिकीट पक्षाने कापलं आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘भाजपनं मला तिकिट का दिलं नाही याचा मी विचार करत आहे. निवडणुकीनंतर याबाबत मी पक्षासोबत चर्चा करेन. पण आता ही चर्चा करण्याची वेळ नाही,’ असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. मला तिकिट का नाही मिळालं नाही याबद्दल मीही अनभिज्ञ आहे. मी त्याबद्दल आत्मपरीक्षण करत आहे,’ असंही तावडे म्हणाले. ‘शरद पवारांसोबत चर्चा नाही’ ‘भाजपने माझं तिकीट कापल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचं बोललं जात आहेत. मात्र या सगळ्या अफवा आहेत. मी पवारांशी चर्चा केली वगैरे यात काही तथ्य नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. आता पक्षाला 2/3 बहुमत मिळवून देणं हे आमचं काम आहे,’ असं म्हणत विनोद तावडे यांनी पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. भाजपची चौथी यादी, कुणाला मिळाली संधी? मुक्ताईनगर - रोहिणी खडसे काटोल - चरणसिंह ठाकूर तुमसर - प्रदीप पडोले नाशिक (पूर्व)- राहुल ढिकले बोरिवली - सुनील राणे घाटकोपर (पूर्वी) - पराग शाह कुलाबा - राहुल नार्वेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या