ऐरवी सेन्सेक्स आणि निफ्टीमुळे चर्चेत असणारं National Stock Exchange आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) आपल्या ट्विटरवर अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिचे फोटो शेअर केले आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोंमध्ये मौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
आपली चूक लक्षात येताच एनएसईने (NSE) ट्विट करुन सांगितलं की, दुपारी 12.25 वाजता एनएसईच्या हँडलवर चूकुन एक चुकीची पोस्ट शेअर झाली. हे NSE चं अकाऊंट सांभाळणाऱ्या एजेन्सीद्वारा चूक झाली आहे. यामध्ये हॅकिंग झालेली नाही. यासाठी आम्ही सर्व फॉलोवर्सची माफी मागतो.
एनएसईद्वारा माफी मागितल्यानंतर यूजर्स त्यांना ट्रोल करीत आहेत आणि यासंदर्भात अनेक मीम्स शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये एका यूजरने लिहिलं आहे की, अच्छा, तर स्टॉक ऑफ द डे चा असा अर्थ होतो.
पीयूष झा नावाच्या एका युजरने लिहिलं की, जेव्हा नोटीस पीरियडमध्ये काम करणारऱ्या कर्मचाऱ्यांना अपेक्षित पगार मिळत नाही तेव्हा असंच काहीसं होतं.
सौमेश बॅनर्जी नावाच्या यूजरने लिहिलं की, यूजरने लिहिलं की, 'मार्केट थोडा वर आला तर एनएसई मजेच्या मूडमध्ये आली. हे सर्व काय सुरू आहे आशिष चौहानजी...
एक यूजरने कमेंट केली आहे की, यासारखी सेक्सी चूक मी आतापर्यंत पाहिली नाही. चूक करायची असेल तर एनएसईकडून शिका. नॉटी एनएसई.'