विराज मुळे, प्रतिनिधी मुंबई, 08 ऑक्टोबर : अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी आज नाना पाटेकर मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार होते. पण ऐनवेळी नाना पाटेकरांनी ही पत्रकार परिषद रद्द केली आहे. अचानक ही पत्रकार परिषद रद्द केल्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधान आलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना अखेर गेल्या काही दिवसांआधी नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं होतं. मी दहा वर्षांपूर्वीही उत्तर दिलं होतं आणि आताही तेच सांगणार, जे खोटं आहे ते खोटचं आहे अशी प्रतिक्रिया अभिनेता नाना पाटेकर यांनी दिली होती. मुंबई विमानतळावर नाना पाटेकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला ही प्रतिक्रिया दिली. मी दहा वर्षांपासून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं होतं. आजही तेच सांगतोय. मुळात जे खोटं आहे ते खोटचं आहे असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. तसंच येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी मी माझी संपूर्ण भूमिका मांडणार आहे अशी घोषणाही नानांनी केली होती पण आज अचानक त्यांनी पत्रकार परिषद रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, यात नानांनी साधगिरीही बाळगली आहे. त्यांनी कायद्याचा सल्ला घेत हा निर्णय घेतला असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नक्की ही पत्रकार परिषद रद्द का केली याचं कारण लवकरच स्पष्ट होईल. तर तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तनुश्री नाना पाटेकर, गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. २००८ मध्ये हाॅर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं असा आरोप तनुश्रीने केला होता. याच सिनेमातील ज्या गाण्यावर वाद निर्माण झाला त्या गाण्याचे गणेश आचार्य हे कॉरियॉग्राफ होते. नाना आणि तनुश्रीमध्ये वाद झाल्यानंतर गणेश आचार्यने नानांची बाजू घेतली होती. त्यावरून तनुश्रीने गणेश यांना खोटारडा आणि दुटप्पी माणूस म्हणून टीका केली होती. Exclusive :तुझा पोलिसांवर भरोसा हाय काय, म्हणत महेश मांजरेकरांनी केला फूल टू राडा!