JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / जलमय मुंबईचे भीषण PHOTOS, रस्ते आणि गाड्या गेल्या पाण्याखाली

जलमय मुंबईचे भीषण PHOTOS, रस्ते आणि गाड्या गेल्या पाण्याखाली

येत्या 48 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे.

0108

मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हे फोटो मुंबईच्या मीरा रोड परिसरातले आहेत.

जाहिरात
0208

दोन दिवसाच्या पावसाने संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेला आहे. नागरिकांना अशात बाहेर निघणं शक्य नाहीये.

जाहिरात
0308

खरंतर, ठाण्यासह उपनगरात पहाटेपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानं चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

जाहिरात
0408

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांचे चांगलेच हाल झाल्याचं पाहायला मिळालं. तर सांताक्रूझच्या वाकोला परिसरात एक घरही कोसळलं. आज पुन्हा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं जोर धरला आहे.

जाहिरात
0508

मुंबई, ठाणे आणि रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

जाहिरात
0608

नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री पासून रिमझिम पाऊस सुरू होता. पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

जाहिरात
0708

मुसळधार पावसामुळे मीरारोड परिसरात कंबरेएवढं पाणी साचलं आहे. अनेक दुचाकी पाण्याखाली गेल्या असून नागरिकही या पाण्यातून वाट काढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0808

अनेक सखल भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढलं. पावसाचा हा जोर पुढचे दोन दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या