या सिनेमात रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. श्रेयाने यापूर्वी एका वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुशांतसिंग राजपूतने खरोखर आत्महत्या केली होती की त्याची हत्या केली गेली हे रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. त्यावरून वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरू आहे.
एकीकडे देशातल्या 3 सगळ्यात मोठ्या तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआय, एनसीबी आणि ईडी या प्रकरणात कसून चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येवर आधारित सिनेमाची घोषणाही करण्यात आली आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित होत सरला सारगोई आणि राहुल शर्मा याची चित्रपट निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिलीप गुलाटी घेणार असून अभिनेता झुबैर खान सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या सिनेमात रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. श्रेयाने यापूर्वी एका वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
तर सिनेमात दिशा सालियानच्या भूमिकेसाठी बिग बॉस फेम अभिनेत्री सोमी खानची निवड करण्यात आली आहे. या स्टोरीमध्ये सुशांतच्या मृत्यूला दिशा सालियानच्या मृत्यूशी जोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं मत चाहत्यांकडून वर्तवण्यात आलं आहे.
दरम्यान, या सिनेमात शक्ती कपूर CBI अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अरुण बक्शी हे सुशांतच्या वडिलांची भूमिका साकारणार असून अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याती भूमिका साकारणार आहेत.