VIDEO :घोषणा थांबल्या,आंदोलक बाजूला झाले,अन् अॅम्ब्युलन्स सुसाट गेली!

Your browser doesn't support HTML5 video.

बुलडाणा, 09 आॅगस्ट : राज्यभरात आज मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका बघायला मिळत असताना बुलडाण्यात या आक्रमक आंदोलनकर्त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. या ठिकाणी  रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांची आरक्षणाच्या मागणीवरुन घोषणाबाजी सुरू असताना याच रस्त्यावरुन रुग्णाला घेऊन जाणारी एक अॅम्ब्युलन्स आली आणि या सर्व आंदोलनकर्त्यांनी आपल्या घोषणा थांबवत अगदी तत्परतेने या अॅम्ब्युलन्सला वाट करुन दिली. सगळीकडे सध्या मराठा आंदोलन सुरू असून आक्रमक वातावरण असताना अॅम्ब्युलन्सला तत्परतेने वाट करुन देणाऱ्या या आंदोलकांची आपल्या या कृतीतून माणुसकी दर्शन घडवलं.

Trending Now