20 मे : बलात्कार करणाऱ्यांचे शिक्षा म्हणून गुप्तांगच कापून टाकावेत अशी मागणी आपल्याकडे अधूनमधून होत असते. पण केरळात अशीच घटना सत्यात उतरलीये. गेल्या आठ वर्षांपासून लैंगिक शोषण करणाऱ्या एका साधूचे पीडित तरुणीने चक्क गुप्तांगच कापून टाकले आहे. कोलममधल्या पनमाना आश्रमात ही घटना घडलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वामी गंगेशनानंद कोल्लम (वय 54) हा पनमाना आश्रमचा सदस्य आहे. शुक्रवारी रात्री या नराधमाने पीडित तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संतापलेल्या तरुणीने धारधार शस्त्रांने स्वामीचे गुप्तांगच कापून टाकलं. नराधम स्वामी हा या तरुणीवर गेल्या आठ वर्षांपासून अत्याचार करत होता. ती 16 वर्षांची होती तेव्हापासून तिच्यावर अत्याचार सुरू होते. या घटनेनंतर जखमी अवस्थेतच स्वामीने त्रिवेंद्रम हाॅस्पिटलकडे धाव घेतली. तिथे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्वामीचं गुप्तांग हे पूर्णपणे कापलं गेलं असून पुन्हा जोडलं अशक्य आहे. या नराधम साधूच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा आणि पाॅक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे या साधूने पोलिसांना दिलेल्या जबाबात आपणच आपल्या हाताने गुप्तांग कापलं अशी जुबानी दिलीये. तर दुसरीकडे, केरळ आणि राज्य महिला आयोग्याच्या सदस्य प्रमिला देवी यांनी या घटनेचं समर्थन केलं. अशा नराधमांसोबत असंच झालं पाहिजे. आम्हाला या मुलीचा अभिमान आहे. धर्माच्या नावावर तरुणींचं शोषण होत असेल तर तिथे हे कदापी सहन केलं जाणार नाही असंही प्रमिला देवी यांनी ठणकावून सांगितलं. स्थानिक प्रसारमाधमांच्या नुसार, या प्रकरणात या तरुणीच्या आईला पोलिसांना ताब्यात घेतलंय. नराधम स्वामीकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती तरुणीला होती. पण तिने याबाबत तक्रार केली नाही. पीडित तरुणीही लाॅची विद्यार्थीनी आहे. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, तिचे वडील पॅरालायसिसने ग्रस्त आहे. नराधम स्वामीने आपल्या आईसोबतही लैंगिक अत्याचार केले. पनामाना आश्रमाने याबद्दल परिपत्रक प्रसिद्ध केलंय. नराधम स्वामी हा आश्रममध्ये शिकण्यासाठी आला होता. 15 वर्षांपूर्वीच त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यानंतर त्याने आश्रम सोडणं गरजेचं होतं पण तसं त्याने केलं नाही.