श्रीनगर/ नवी दिल्ली, 25 डिसेंबर : संपूर्ण देशात 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसची (Christmas) धूम आहे. सगळेच जण ऑफिस, शाळा आणि कॉलेजांमध्ये ख्रिसमस मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. आपला हा आनंद त्यांच्यामुळे आहे त्या जवानांनीही सीमेवर ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं आहे. सैन्याने याचा एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काश्मिरात नियंत्रण रेषेजवळील बर्फाच्छादित भागात लष्करी कर्मचारी ख्रिसमस साजरा करत आहेत. ‘जिंगल बेल्स’ गाऊन ख्रिसमस साजरा करताना तरुण जवान दिसत आहेत. याआधी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंगळवारी सांगितलं की, आजच्या जगात प्रचलित असलेल्या ‘अशांतता, द्वेष आणि हिंसाचार’ पासून पीडितांना दिलासा देण्याची शक्ती येशू ख्रिस्ताच्या शिकवणीत आणि त्यांच्या कार्यांमध्ये आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी ‘सर्व नागरिकांना आणि विशेषत: ख्रिश्चन भावंडांना भारत आणि परदेशात’ अभिवादन केलं.
राष्ट्रपती म्हणाले, ‘आम्ही येशू ख्रिस्ताचा वाढदिवस साजरा करतो, ज्याचे जीवन मानवतेत प्रेम, दया आणि बंधुतेचा संदेश देते. आज जेव्हा जग अशांतता, द्वेष आणि हिंसाचाराने ग्रस्त आहे, तेव्हा त्यांचे शब्द आणि शिकवणीतून पुढचा मार्ग दिसेल.’ ते म्हणाले की, अशी वेळ आली आहे की आपण येशू ख्रिस्ताने दिलेल्या मार्गाचा अवलंब करण्याचे व अधिक दयाळू व न्याय्य समाज निर्माण करण्याचा’ संकल्प केला पाहिजे.’ त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ख्रिसमसच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना ते म्हणाले की, येशू ख्रिस्ताची शिकवणी जगभरातील कोट्यावधी लोकांना प्रेरणा देते. ‘मेरी ख्रिसमस. प्रभु येशू ख्रिस्ताचे उदात्त विचार आम्हाला मोठ्या आनंदाने आठवतात. ते म्हणाले की, येशू ख्रिस्त सेवा, करुणा आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी जीवनासाठी समर्पणाते प्रतीक आहे. त्यांचे शिक्षण जगातील कोट्यावधी लोकांना प्रेरणा देईल.