मुंबई, २१ फेब्रुवारी २०१९- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे हल्ल्याचे पुरावे मागण्यात आले आणि चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ठेवला. नेमकी याच गोष्टीवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्माने इमरान खान यांच्यावर निशाणा साधला. राम गोपाल वर्माने ट्विट करत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना एक प्रश्न विचारला की, जर बोलून प्रश्न सुटत असते तर तुम्ही तीन लग्न का केली.
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि अन्य नुकसानाबद्दल खान यांनी पाकिस्तानची बाजू मांडली. यावर रामूने त्याच्या स्टाइलमधअये उत्तर दिलं. रामूने ट्वीट करत इमरान यांनाच उलट प्रश्न विचारला. वर्माने त्याच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, प्रिय पंतप्रधान तुम्ही आम्हा मूर्ख भारतीयांना सांगू शकता का की एखादी व्यक्ती तुमच्यासमोर किलोभर स्फोटक घेऊन हल्ला करायला येत असताना त्याच्याशी चर्चा कशी करायची. जर तुम्ही हे आम्हाहा शिकवलं तर आम्ही भारतीय तुम्हाला ट्युशन फीही देऊ.
यासोबतच रामूने अजून एक ट्विट करत इमरान खान यांना प्रश्न विचारला की, ‘तुमच्या देशात कोण राहतं हे तुम्हाला माहीत नसतं पण अमेरिकेला कळतं तर तुमचा देश खरचं ‘देश’ आहे का? माझ्यासारख्या मूर्ख भारतीयाला हे एकदा समजावून सांगा.’
जगभरातून पुलवामा हल्ल्याची निंदा होत असून पाकिस्तान आपल्यापरिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी राग व्यक्त केला जात असून सरकारने दुसरं सर्जिकल स्ट्राइक करावं अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिलासा देत दहशतवाद्यांना सूट मिळणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. VIDEO: आर्ची देतेय 12 वीची परीक्षा; पाहिलं का तुम्ही?