JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / GOOD NEWS! करिना आणि सैफ पुन्हा एकदा झाले आई-बाबा, नव्या पाहुण्यामुळे कपूर कुटुंबात उत्साह

GOOD NEWS! करिना आणि सैफ पुन्हा एकदा झाले आई-बाबा, नव्या पाहुण्यामुळे कपूर कुटुंबात उत्साह

Kareena Kapoor Latest Update: 21 फेब्रुवारी रोजी करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करिनाने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर यावर्षी लॉकडाऊनमध्ये करिनाना प्रेग्नेंट होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 फेब्रुवारी : अभिनेत्री करिना कपूर (kareena kapoor) हिच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. करिना आणि सैफ यांना पूत्ररत्नाचा लाभ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये करिना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करिना कपूर हिला काल रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 21 फेब्रुवारी रोजी करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करिनाने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर यावर्षी लॉकडाऊनमध्ये करिनाना प्रेग्नेंट होती. दुसऱ्या बाळाचा जन्मानंतर करिना आणि सैफ नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे घर अधिक प्रशस्त असणार आहे. दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यान अभिनेत्रीने आपल्या व्यावसायिक कमिंटमेन्टस् पूर्ण करीत होती. दरम्यान नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी कपूर कुटुंबीय सज्ज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबीय व मित्रमंडळींकडून करिनाने शुभेच्छा पत्र व भेटवस्तू येत होत्या. करिना आणि सैफ पुन्हा एकदा आई-बाबा झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या