18 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निलंबनाची शिक्षा झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना बीसीसीआयनं आज मोठा दिलासा दिला आहे. या दोन्ही संघांना आयपीएलमधून बरखास्त न करण्याचा निर्णय बोर्डानं घेतला आहे. त्यामुळे दोन वर्षांची निलंबनाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर चेन्नई आणि राजस्थान पुन्हा स्पर्धेत खेळू शकणार आहेत. तसंच, 2016च्या आयपीएल स्पर्धेत दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार असल्यानं 2018च्या आयपीएल स्पर्धेत एकूण दहा संघांमध्ये ‘रन’संग्राम रंगणार आहे.
आयपीएल-6 मधील स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालानूसार राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे यापुढे आयपीएलमध्ये नेमके किती संघ खेळतील याविषयी उत्सुकता होती. यापार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत, या दोन्ही संघांवर कायमची बंदी न घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पेप्सीने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर व्हिवो या मोबाईल कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व देण्यात आले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++