05 डिसेंबर : INS विक्रांतला वाचवण्याच्या प्रयत्नांना आता वेग आला असून या मोहिमेत भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. INS विक्रांतच्या संदर्भात भाजप नेते गोपीनाथ मुंडे, किरीट सोमय्या आणि प्रकाश जावडेकर हे संरक्षणमंत्री ए.के. अँटोनींना भेटणार आहेत. भारतीय नौदलातर्फे INS विक्रांतचा लिलाव करण्यात येणार आहे. INS विक्रांतचा संग्रहालय म्हणून सांभाळ करण्यात राज्य सरकार आणि नौदल अपयशी ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. INS विक्रांतने 1971च्या युद्धात निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र नौदलाच्या INS विक्रांतचा लिलाव दुदैर्वी असल्याचं मत माजी लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं आहे. INS विक्रांतचे म्युझियम करायला हवे असे मतदेखील हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.