नवी दिल्ली, 13 जानेवारी : इंडियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये (poultry farm) कडकनाथ कोंबडया पाळल्या होत्या. मात्र जिथून धोनीनं हे कडकनाथ कोंबडयांचे पिल्ले खरेदी केले होते तिथे बर्ड फ्लूचा संसर्ग (bird flu infection) झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता असा अंदाज लावला जातो आहे, की धोनीच्या फार्मवर पाळलेल्या जवळपास 2.5 हजार कडकनाथ कोंबड्याही मारल्या जाऊ शकतात. कडकनाथ कोंबड्यांना मांसासाठी खूप मागणी आहे. या कोंबड्याच्या मांसाचा दर खूप जास्त असतो. आणि देशात सर्वात महाग अंडी कडकनाथ कोंबड्यांची असतात. नुकतंच धोनीनं फार्मिंग आणि डेअरीचा कारभारही सुरू केला. कडकनाथ प्रजातीचा अंडा देणाऱ्या एका कोंबडीची किंमत बाजारात 3 ते 4 हजार रुपये आहे. तुम्ही कोंबडीचं पिल्लू आणून पाळाल तर ते 6 ते 7 महिन्यांनी अंडा देण्यालायक होतं. मात्र एक पिल्लू 80 ते 100 रुपयात मिळतं. राजस्थानच्या कोटा इथं कडकनाथ कोंबडा पाळणाऱ्या आणि तिच्या अंड्यांचा व्यवसाय करणाऱ्या हफीजभाईंचं म्हणणं आहे, की बाजारात कडकनाथची डिमांड जास्त आणि पुरवठा कमी असल्यानं याची एकच कुठली ठरलेली किंमत नाही. आजघडीला कडकनाथचं अंडं 20 रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंत मिळतं. पोल्ट्रीचे जाणकार अनिल शाक्य सांगतात, की काही हकीम आणि वैद्य दावा करतात, की कडकनाथ चव आणि पोषकगुण या निकषांवर अनेक गुणांनी युक्त असतं. कदाचित म्हणूनच त्यांना मागणी जास्त असते. मात्र तरीही कडकनाथचं चिकन जर ती कोंबडी असेल तर 800 ते 1000 रुपये किलो आणि कोंबडा असेल तर 1400 ते 2 हजार रुपये किलोपर्यंत बाजारात विकलं जातं आहे. इतरही अनेक तज्ज्ञ सांगतात, की कडकनाथ कोंबडीचं अंडं सामान्य कोंबडीहून जास्त आरोग्यदायी असतं. यात प्रथिनं जास्त असतात असं म्हटलं जातं. यात कोलेस्ट्रॉल कमी असल्यानं हार्ट पेशंटही हे अंडं खाऊ शकतात.