भरपावसात परेडचा सराव सुरू आहे. लाल किल्ल्यावर आणखीन काय तयारी करण्यात आली आहे पाहा.
74 व्या स्वतंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट असलं तरी लाल किल्ल्यावर मात्र जोरदार तयारी सुरू झाली आहे.
15 ऑगस्टला सोशल डिस्टन्स, सॅनिटाइझ आणि कोरोनाचं संक्रमण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.
यंदा लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रम सोहळ्यात लहान मुलांऐवजी कोरोना वॉरियर्सना खास निमंत्रण आहे. यंदाचा स्वतंत्र्यदिन त्यांच्यासोबत साजरा केला जाणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर सॅनिटायझेशन करण्यात आलं आहे. पोलीस आणि वॉलेंटियर्स तैनात असणार आहेत. याशिवाय तिथल्या नियमांचं काटेकोर पणानं पालन केलं जाणार आहे. थर्मल स्क्रिनिंगही असणार आहे.
लाल किल्ल्यावर आज जवानांनी संपूर्ण ड्रेस परिधान करून परेडचा सराव केला. स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आज हा सराव करण्यात आला .