JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / लडाखमध्ये लष्कराची जय्यत तयारी, जवानांची घरं पाहून चीनलाही फुटेल घाम; पाहा PHOTOS

लडाखमध्ये लष्कराची जय्यत तयारी, जवानांची घरं पाहून चीनलाही फुटेल घाम; पाहा PHOTOS

लडाख आणि परिसरात आता बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. तापमान -20 डिग्री एवढं असून हाडं गोठविणाऱ्या या थंडाचा मुकाबला करण्यासाठी सैनिक सज्ज झाले आहेत.

019

लडाखमध्ये चीन सोबतचा तणाव कायम आहे (India-China Ladakh Border Tension). भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना रोखून धरण्यात यश मिळवलं असून त्यांच्या मुजोरीला मोठा दणका दिला आहे. चीनचं संकट कायम असताना लष्करापुढे आता दुसरं संकट निर्माण झालं आहे.

जाहिरात
029

हे संकट नैसर्गिक असून त्याचा लष्कर समर्थपणे मुकाबलाही करत आहे. लडाख आणि परिसरात आता बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. तापमान -20 डिग्री एवढं असून हाडं गोठविणाऱ्या या थंडाचा मुकाबला करण्यासाठी सैनिक सज्ज झाले आहेत.

जाहिरात
039

या भागातल्या उचं टेकड्यांवर तर तापमान हे -40 पर्यंतही जात असतं. यावेळी तणावामुळे भारताने जास्तीचे सैनिक तैनात केले आहेत. या भागात तब्बल 50 हजार सैनिक तैनात असल्याची माहितीही देण्यात आलीय. नोव्हेंबर नंतर या भागात तब्बल 40 फुटांपर्यंत बर्फ जमा होत असतो.

जाहिरात
049

त्यामुळे इथे तैनात असलेल्या सैनिकांची कसोटी लागत असते. अशा वातावरणात काम करणं हे सर्वात कठिण काम असतं. त्यामुळे लडाखमध्ये 15 दिवसांत सैनिकांची ड्युटी बदलली जात आहे.

जाहिरात
059

इथे राहणाऱ्या सैनिकांसाठी लष्कराने खास घरं तयार केली आहेत. ही घरं थंडीतही उबदार राहू शकतात. त्यामुळे या घरांची निर्मिती करण्यात आली आहे.

जाहिरात
069

सैनिकांना दीर्घकाळ या भागात राहावं लागणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. हिमवर्षाव झाला तरी या घरांवर त्याचा परिणाम होणार नाही.

जाहिरात
079

हिटर आणि इतर सुविधांनी ही घरं सज्ज असून त्यातून त्यात बेड्स आणि कपाटं ठेवण्यात आली आहेत. सैनिकांना यासुविधांचा मोठा फायदा होणार आहे.

जाहिरात
089

अनेक घरांमध्ये बंक बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून तिथे जास्त जवान राहू शकतात.

जाहिरात
099

या भागात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बोअरवेल्सही खोदण्यात आल्या आहे. त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा करणं सोपं जाणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या