ICC Cricket World Cup 2019 : रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड़ कप स्पर्धेत रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सलग दुसऱ्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीला सुवर्णसंधी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी साधण्याची संधी त्याला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीला सुवर्णसंधी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी साधण्याची संधी त्याला आहे.
सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून विराट कोहली फक्त एक शतक दूर आहे. कोलहीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 शतकं केली आहेत.
वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. रविवारी भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना होणार आहे.