JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / VIDEO- ‘सुपर 30’ मधल्या हृतिकला पाहून तुम्ही व्हाल दंग, असा हृतिक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल

VIDEO- ‘सुपर 30’ मधल्या हृतिकला पाहून तुम्ही व्हाल दंग, असा हृतिक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल

हृतिक या सिनेमात बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हृतिकनेही या सिनेमासाठी कसून मेहनत घेतल्याचं या सिनेमात दिसतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जून- हृतिक रोशनच्या सुपर ३० सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सुमारे वर्षभरानंतर हृतिकचा सिनेमा येत असल्यामुळे त्याचे चाहते फार उत्सुक आहेत. या सिनेमात हृतिकचा एक वेगळा अंदाज लोकांना पाहायला मिळणार आहे. हृतिक या सिनेमात बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हृतिकनेही या सिनेमासाठी कसून मेहनत घेतल्याचं या सिनेमात दिसतं. ट्रेलरची लक्षवेधी गोष्ट म्हणजे हृतिक बोलत असलेली भाषा. हृतिकने बिहारी भाषेचा लहेजा खूप चांगल्याप्रकारे आत्मसात केला आहे. VIDEO- ‘सुपर ३०’ च्या क्लासमध्ये दिसला हृतिक, म्हणाला उठा, शिका, लढा… या सिनेमात आनंद कुमार यांची गोष्ट सांगण्यात आली आहे. सुरुवातीला आनंद (हहृतिक) यांना मोठ्या क्लासमध्ये शिकवण्याची संधी मिळते. ते शिकवायला सुरुवातही करतात. मात्र सधन मुलांना शिकवताना त्यांच्या लक्षात येतं की, जी मुलं गरीब आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय? शेवटी आनंद गरीब वर्गातील मुलांना मोफत शिकवणी देण्याचं निश्चित करतात. त्यांच्या या निर्णयानंतर नावाजलेल्या कोचिंग क्लासेसच्या मालकांना धक्का बसतो. यानंतर कथानक वेगळं वळण घेतं. फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान या ट्रेलरमध्ये सिनेमात नक्की काय दाखवण्यात येणार आहे याची उत्तमरित्या झलक दाखवली आहे. सिनेमात हृतिकसोबत पंकज त्रिपाठीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हृतिक मुलांचा क्लास कसा घेणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या