आपण प्रेमात पडलो तर,आपलं मन (Heart) एखाद्याबद्दल चांगला (Positive) विचार करायला लागतं. पण, प्रेमाचा संबंध मनाशी नाही मेंदूशी असतो असं सांगितलं तर विश्वास ठेवाल का?
एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात (Love) पडण्याची अनेक कारणं असतात. मात्र सायन्सनुसार प्रेमात पडलेल्या व्यक्तींचे हार्मोन्स (Hormones) वाढलेले असतात. त्यामुळे त्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लागतं.
एखाद्याच्या प्रेमात पडण्याची जी कारणं असतात. त्यातलं महत्वाचं कारणं असतं हार्मोन्स (Hormones) मजबूत होणं. हार्मोन्समुळे एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लागतं.
प्रेमात पडण्याच्या 3 स्टेज असतात. लस्ट, ऍट्रॅक्शन, अटॅचमेंट या तिन्ही गोष्टी हार्मोन्सशी जोडलेल्या असतात.
लस्ट हे एक लिम्बिक सिस्टीम आहे. ज्यात सुरुवातील शारीरिक आकर्षण वाटतं. आपण ज्या व्यक्तीचा विचार करतो त्यांच्याबद्दल ही भावना वाटत असते. एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन हॉर्मोन या भावनेसाठी कारणीभूत असतात.
ही स्टेज फर्स्ट बायोलॉजिकल रिस्पॉन्स नंतर सुरु होते. त्याच्या जोडीने काही हॉर्मोनल रिस्पॉन्स ट्रिगर होतात. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं शरीरातल्या स्ट्रेस रिस्पॉन्समुळे होतं.
हृदयाची धडधड वाढणे, तोंड सुकणं, घाम येणं हे सगळ्या रिऍक्शन ऍड्रेनालाईनला ट्रिगर करतात. तर, प्रेमात पडल्यामुळे न्यूरोट्रांसमीटर डोपामाईनच्या उत्पादनाला चालना मिळते. यालाच हॅप्पी हॉर्मोन म्हणतात.
मनातल्या आनंदाच्या भावनेला डोपानाईन कारणीभूत असतं. यामुळे उत्साह आणि कॉन्सनट्रेशन वाढत पण, भूक कमी होते.
अटॅचमेंटच्या भावनेत ऑक्सिटोसिन हॉर्मोन वाढतात. ऑर्गेजममध्ये ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो. हेच एकमेकांबद्दल ओढ निर्माण करतं.
वासोप्रेसिन नावाचं हार्मोनचंही उत्पादन शरीरात होतं. सेक्स आणि पार्टनरशी रिलेशनमध्ये या हार्मोनचा रोल असतो. हा हार्मोन सेक्सनंतर लगेच रिलीज होतो. त्याशिवाय रिलेशनशिपमध्ये हेल्दी बॉन्डींग निर्माण करण्यासाठी हे आवश्यक असतं.
पार्टनर बरोबर ब्रेकअप होण्याची लक्षणं सुरवातीलाच दिसायला लागतात. या कामात डोपामाइन हॉर्मोन मेंदूला नियंत्रीत करतं. त्यामुळेच ब्रेकअप नंतर लगेचच आपल्याला मान दुखावल्याची भावाना वाटायला लागते.