सनी तर एक ब्रँड आहे, ज्याला मी स्वतः तयार केलं आहे. सिनेमात दिसणारी, गाण्यांवर नाचणारी सनी सगळ्यांना दिसते करनजीत साऱ्यांनाच दिसत नाही.
बर्थडे गर्ल सनी लिओनीने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आयुष्यावर बेतलेली करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी वेबसीरिज आली होती. या वेबसीरिजमध्ये तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता.
यात काही अशा घटना होत्या ज्या आतापर्यंत कोणीच ऐकल्या नव्हत्या आणि अनेकांना त्या माहीतही नव्हत्या. जसं की सनीला गुग्गु नावाने तिच्या घरचे हाक मारतात. कॅनेडात राहणाऱ्या सनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती.
याशिवाय या वेबसीरिजमध्ये तिच्या शाळेतील अनुभवांबद्दल सांगण्यात आले आहे. शाळेत असताना सनीच्या लुकमुळे तिला फार ट्रोल केलं जायचं. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की, शाळेत पाय वॅक्स करुन न जाण्यामुळेही सनीला ट्रोल केलं जायचं.
आजही समाजात महिलांच्या लुकबद्दल समाजाचे मापदंड ठरलेले आहेत. वॅक्स करणं अथावा न करणं ही त्यांचं मत असू शकतं हे कोणीही मान्य करत नाही. सनीच्या वेबसीरिजमध्ये पायांवरच्या केसांमुळे तिची थट्टा कशी उडवली गेली होती ते दाखवण्यात आले आहे.
जेव्हा ही वेबसीरिज आली होती तेव्हा सनीने मुलाखतीत म्हटले होते की, यातले प्रत्येक दृश्य हे प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘या बायोपिकमध्ये तुम्हाला करनजीत दिसेल जी मी स्वतः आहे. सनी तर एक ब्रँड आहे, ज्याला मी स्वतः तयार केलं आहे.’
सनीशिवाय या वेबसीरिजमध्ये राज अर्जुन, रायसा सौजानी, करमवीर लांबा, बिजय जसजीत आनंद, गृषा कपूर, वंश प्रधान आणि मार्क बक्नर होते. या सीरिजमध्ये सनी लिओनीच्या खासगी आयुष्यातील स्ट्रगलपासून ते बॉलिवूड स्टार होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.