JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मला पक्ष सोडण्यास भाग पाडलं गेलं, राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नसल्याचा आझादांचा पुनरोच्चार

मला पक्ष सोडण्यास भाग पाडलं गेलं, राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नसल्याचा आझादांचा पुनरोच्चार

राहुल गांधी यांच्यात राजकीय कौशल्य नाही. तसेच त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेस पक्षाची ही स्थिती झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत मागच्या आठवड्यात पक्षाला सोडचिठ्ठी दिली. इतक्या मोठ्या नेत्याने राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश वर्तन असल्याचा आरोप केला. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणाले गुलाम नबी आझाद - गुलाम नबी आझाद म्हणाले की, राहुल गांधी यांच्यात राजकीय कौशल्य नाही. तसेच त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेस पक्षाची ही स्थिती झाली आहे. आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नाही. तसेच मी काँग्रेस सोडून गेलो नाही तर मला मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं, असा आरोपही त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, आपलं घर कोण सोडतो, माझ्या कुटुंबीयांनी मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले. घरातच जर आपल्याला परकं समजलं जाऊ लागलं तर? असा सवालही त्यांनी केला. तसेच पुढे-मागे करणाऱ्या किंवा ट्वीट करणाऱ्या लोकांनाच पक्षात पद मिळतं, अशी टीकाही त्यांनी केली. माझा डीएनए मोदी वाला असल्याची जे लोक चर्चा करतात त्यांनी आधी स्वत:कडे पाहावे, असेही ते म्हणाले. राहुल गांधींचा प्रवेश आणि… दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेत्या यांच्याबाबतही आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, सोनिया गांधी यांनी 1998 ते 2004 दरम्यान, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचे काम केले. सोनिया गांधी या ज्येष्ठ नेत्यांकडून सल्ला घेत होत्या. तसेच त्या त्यांच्यावर अवलंबून होत्या आणि त्यांचे सल्लेही ऐकायच्या. त्यांनी मला आठ राज्यांची जबाबदारी दिली होती. त्यापैकी सात राज्यांमध्ये मी विजय मिळवून दिला होता. सोनिया गांधी या कधीच हस्तक्षेप करत नव्हत्या. हेही वाचा -  काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार? गुलाम नबी आझाद यांनी केला मोठा खुलासा मात्र, 2004 नंतर राहुल गांधींचा प्रवेश झाला आणि ही पद्धत संपली. सोनिया गांधीं या राहुल गांधींवर अवलंबून राहू लागल्या. मात्र, राहुल गांधींकडे कोणतेही राजकीय कौशल्य नाही, अशी टीका करत राहुल गांधींशी सर्वांनी समन्वय साधावा असे आपल्याला वाटते, असेही ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या