हाॅलमार्क - ब्युरो आॅफ इंडियन स्टॅण्डडर्सनं हाॅलमार्क ही पद्धत आणली. बीआयएसच्या निकषाप्रमाणे सोनं आणि दागिने प्रमाणित करणं आवश्यक आहे. त्यामुळे हाॅलमार्क असलेले दागिने असली सोन्याचे असतात.
मुंबई 26 जून : सोन्याच्या भावानं 5 वर्षातला उच्चांक गाठलाय. पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थव्यवस्थेतली अनिश्चितता सोन्याच्या पथ्यावर पडतेय त्यामुळेच ही वाढ होत असल्याची बोललं जातंय. अमेरिका आणि इराणमधला तणाव, अमेरिका-चीनमधलं ट्रेड वॉर, जागतिक अर्थव्यवस्थेतली सुस्ती यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळालेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजात घट करण्याचे संकेत दिले. त्यामुळे डॉलर कमजोर झाल्यानं सोनं स्वस्त झालं होतं.गुंतवणूकदार आजही शेअर बाजाराऐवजी सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूकीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे सोन्याच्या भावानं मागील सहा वर्षातले रेकॉर्ड मोडलेत.